Janhvi Kapoor-Varun Dhawan Instagram/@varundvn
मनोरंजन बातम्या

Bawaal Song Dil Se Dil Tak Out : वरुण-जान्हवीची 'बवाल' केमिस्ट्री; दिल से दिल तक गाणं व्हायरल

Janhvi Kapoor-Varun Dhawan Chemistry : 'दिल से दिल तक' गाण लॉंच झाल्यानंतर वरुण धवन आणि जान्हवीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bawaal New Song Out : वरुण धवन हा इंडस्ट्रीतील 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जातो. तर जान्हवी कपूर 'धडक गर्ल' म्हणून ओळखली जाते. अशा या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. 'बवाल' या चित्रपटातून जान्हवी आणि वरुणची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'बवाल' चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे. नुकतच चित्रपटातील दिल से दिल तक हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाण लक्ष्य कपूर,आकाशदीप सेनगुप्ता आणि सुवर्णा तिवारीने गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

हे गाणं लॉंच झाल्यानंतर वरुण धवन आणि जान्हवीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत वरुण-जान्हवीची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यात वरुणने गुलाबी रंगाचे टी-शर्ट तर जान्हवीने पांढऱ्या रंगाचा वन पीस आणि जॅकेट परिधान केले आहे. व्हिडिओत वरुण जान्हवी दोघंही वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. यात त्यांनी एकमेकांना गालावर किसही केले आहे. त्यांच्या या व्हिडिओला ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीची झलक म्हणायला हरकत नाही.

या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओत त्यांचाच आगामी चित्रपट बवालचं 'दिल से दिल तक' हे गाणं आहे.या गाण्यात सुरवातीला वरुण आणि जान्हवीमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसत आहे. पण नंतर या दोघांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला 'अज्जू और निशा का बवाल' असं कॅप्शन दिले आहे.

जान्हवी वरुण पहिल्यांदाच 'बवाल' चित्रपटातून एकत्र दिसणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहे. हा चित्रपट २१ जुलैला 'अॅमेझॉन प्राइम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांनी मात्र निराशा व्यक्त केली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर वरुण बवालनंतर लवकरच 'सिटाडेल' या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जान्हवी लवकरच 'देवरा' आणि 'जन गण मन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT