bigg boss marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : घे पाऊल पुढे जरा...वर्षा आणि सुप्रिया यांच्यात डान्सची जुगलबंदी, पाहा VIDEO

Varsha Usgaonkar - Supriya Pilgaonkar Dance : आजचा बिग बॉसचा एपिसोड खूप खास ठरणार आहे. आज घरात सुप्रिया पिळगांवकर आणि वर्षा ताई यांच्यात भन्नाट डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

बिग बॉस घरात वीकेंडला महाराष्ट्राचा धक्का पाहायला मिळत आहे. काल म्हणजे शनिवारी बिग बॉस घरात पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर काल संग्राम चौगुलेला घर सोडाव लागले. त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बिग बॉसने हा निर्णय घेतला.

आज बिग बॉस घरात 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाचे कलाकार येणार आहेत. यात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar ), अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेते अशोक सराफ हे देखील आले आहेत. आजचा एपिसोड खूप धमाल-मस्तीचा होणार आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर्षा ताई आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

सुप्रिया पिळगांवकर आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या दोघीही एकमेकींच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नीलेश साबळे म्हणतात, "सुप्रिया ताई तुमचं गाणं वाजल्यावर वर्षा ताई परफॉर्म करतील आणि वर्षाताईंच गाणं वाजलं की सुप्रिया ताई तुम्ही डान्स करायचा." यानंतर वर्षा ताई सुप्रिया पिळगांवकर यांच्या 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करते. तर दुसरीकडे सुप्रिया पिळगांवकर वर्षा ताईंच्या 'मी आले…' या गाण्यावर भन्नाट डान्स करतात.

पुढे या दोघींनाही स्वप्नील जोशी डान्स करताना साथ देतात. डान्स झाल्यावर पुन्हा नीलेश साबळे अशोक मामांना विचारतात की, "तुमच्या घरीचं बिग बॉस कोण आहे?" यावर अशोक मामा म्हणतात, "तुम्ही माझ्या मर्मावर बोट ठेवलं" यानंतर सर्वजण हसू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT