Thriller Shows  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Thriller Shows : जगातील दडलेली सर्व रहस्ये आता उलगडणार, अज्ञात वन्यजीव विषयक थरारक शो प्रेक्षकांच्या भेटीला

Thriller Shows List : आता प्रेक्षकांना प्राचीन रोमपासून ते अज्ञात वन्यजीव विषयक विविध थरारक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

या वर्षी शेवटच्या महिन्यात सोनी BBC अर्थ ही अत्यंत लोकप्रिय वास्तविक मनोरंजन वाहिनी तीन नवीन वेधक शो घेऊन येत आहे. प्रेक्षक एका अविस्मरणीय सफरीवर जातील – प्राचीन रोमन सम्राज्यापासून ते मोकाट पसरलेले वन्य प्रदेश आणि जगातील सगळ्यात भयंकर रस्त्यांपर्यंत. या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट सादर करण्यात येईल, ज्याचा आस्वाद सर्व साहस-प्रिय प्रेक्षक घेऊन शकतील.

आकर्षक कार्यक्रमांची सुरुवात 2 डिसेंबर 2024 रोजी 'जूलियस सीझर: द मेकिंग ऑफ डिक्टेटर' या शोपासून होईल. या मालिकेत प्रेक्षकांसमोर पाश्चात्य इतिहासातील एका अत्यंत प्रभावी नेत्याची जीवन गाथा उलगडण्यात येईल. त्याच्या युद्ध मोहिमा आणि राजकीय मुत्सद्देगिरीपासून त्याच्या संघर्षांपर्यंतचे चित्रण करणाऱ्या या मालिकेत रोमन संस्कृती आणि परंपरांचे दर्शन प्रेक्षकांना घडेल.

16 डिसेंबर 2024 रोजी 'स्टोरीज फ्रॉम द वाइल्ड' (अपना भारत सबका भारत) या कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात पशू जगतातील रांगडे नाट्य प्रेक्षक अनुभवू शकतील. ही मालिका 'स्टोरीज फ्रॉम इंडिया' या खास मालिकेचा एक भाग असेल, ज्या मालिकेत 'हिडन इंडिया' आणि 'गॅंजिस ' हे शोज देखील आहेत. 'स्टोरीज फ्रॉम द वाइल्ड' या शोमध्ये प्रेक्षक प्राण्यांमधील शत्रुत्व, सत्ता संघर्ष आणि जिवंत राहण्यासाठीचा लढा यांचे वेधक चित्रण बघू शकतील. या शोमध्ये पशू जगत आणि मानव समाज यांच्यातील प्रचंड साम्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि सतत बदलत असलेल्या वातावरणात निसर्गातील जीव जिवंत राहण्यासाठी कसा अखंड लढा देत आहेत हे उघड करून दाखवले आहे.

30 डिसेंबरपासून 'वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस रोड्स' चे वेगवेगळे सीझन पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सू परकिन्स, ऱ्होड गिल्बर्ट आणि ह्यू डेनिस या नामवंतांच्या सोबत जगभरातील अत्यंत जोखमी आणि भयंकर रस्त्यांवरून प्रेक्षक प्रवास करू शकतील. कठोर हवामान परिस्थिती आणि ओबडधोबड प्रांतांपासून ते सांस्कृतिक प्रदेशांपर्यंत खडतर मोहिमा करणाऱ्यांचे साहस या मालिकेत बघायला मिळेल.

या थरारक प्रीमियर्ससह सोनी BBC अर्थ डिसेंबरमध्ये शोध आणि साहसाचा मोसम साजरा करत आहे आणि जगातील विविध प्रकारचे सौंदर्य, दडलेली रहस्ये आणि अद्भुतता यांचा शोध घेणार आहे. 2, 16 आणि 30 डिसेंबर रोजी अनुक्रमे 'जूलियस सीझर: द मेकिंग ऑफ अ डिक्टेटर', 'स्टोरीज फ्रॉम द वाइल्ड' आणि 'वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस रोड्स' यांचे प्रीमियर प्रसारण दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट, परळीच्या बड्या नेत्याचं कनेक्शन; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

Rahu Gochar 2026: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT