Nargis Fakhri : नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक,बॉयफ्रेंडला मारल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Nargis Fakhri Sister Aliya Arrested : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहिण आलियाला अटक करण्यात आली आहे. एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.
Nargis Fakhri Sister Aliya Arrested
Nargis FakhriSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) नेहमी तिच्या लूक्स आणि कामामुळे चर्चेत असते. मात्र आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 'रॉकस्टार' फेम बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. नर्गिसच्या बहीणीचे नाव आलिया (Aliya Fakhri) आहे.

नर्गिसची बहीण आलियावर एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्सला मारण्याचा आरोप करण्यात आला आहे. फक्त तिने बॉयफ्रेंडला मारले नसून त्याची मैत्रीण अनास्तासिया स्टार एटीन हिचा देखील खून केल्याचा आरोप आलियावर करण्यात आला आहे.

आलियाने हे सर्व बदल्याच्या भावनेने केल्याचे सांगितले जात आहे. तिने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे असलेल्या गॅरेजला आग लावली. या आगीत आलियाचा बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या मैत्रीणीचा मृत्यू झाला. आगीमुळे गुदमरल्याने आणि भाजल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात अमेरिकेत पोलीसांनी तिला अटक केली आहे. तसेच तिचा जामीन देखील नाकारला आहे. डिस्ट्रिक्ट अटॉर्नी मेलिंडा कॅट्झ यांनी आलियाने हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचे म्हटलं आहे. साक्षीदारांने दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी आलिया गॅरेजमध्ये आली. तिने एडवर्ड जेकब्सला धमकी दिली होती की, "तुम्ही सर्वजण आज मरणार..." अशी माहिती मेलिंडा कॅट्झने दिली.

नर्गिस फाखरीने यावर अद्याप कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नसून तिच्या आईने मात्र आपल्या मुलीची बाजू घेतली आहे. 'माझी मुलगी असे करू शकत नाही' असे नर्गिसच्या आईने सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलियाचे तिच्या बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्ससोबतचे नाते एक वर्षाआधीच संपले आहे. एडवर्ड आणि अनास्तासिया हे चांगले मित्र होते. तसेच आलियाने बॉयफ्रेंडला तुझे घर जाळून टाकेन अशी धमकी दिली होती. तसेच या प्रकरणाची सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे.

Nargis Fakhri Sister Aliya Arrested
Sobhita Dhulipala : लगीन घटिका समीप आली! शोभिताने शेअर केले 'पेल्ली कुथुरु' समारंभाचे फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com