Vaani Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vaani Kapoor Birthday: हॉटेलमध्ये काम करणारी मुलगी ते बॉलिवूडची सुपरस्टार...; अभिनेत्री वाणी कपूरचा थक्क करणारा प्रवास

Vaani Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आज ३७ वर्षांची झाली आहे. कोणताही सपोर्ट नसताना, वाणीने स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज ती कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे.

Shruti Vilas Kadam

Vaani Kapoor Birthday: २३ ऑगस्ट १९८८ रोजी जन्मलेली बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा आज ३७ वा वाढदिवस आहे. 'शुद्ध देसी रोमान्स' पासून सुरू झालेला तिचा चित्रपटांचा प्रवास 'वॉर' आणि 'चंडीगड करे आशिकी' सारख्या चित्रपटांपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे कोणताही सपोर्ट नसताना, वाणीने स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज ती कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे.

शिक्षण आणि कारकिर्दीची सुरुवात

वाणीने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील माता जय कौर पब्लिक स्कूलमधून केले. त्यानंतर तिने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटनात पदवी घेतली. त्यानंतर वाणी हॉटेलने मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आणि जयपूरमधील ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली. याशिवाय तिने काही काळ आयटीसी हॉटेलमध्येही काम केले. हॉटेल उद्योगात काम करत असताना तिची भेट एलिट मॉडेल मॅनेजमेंट एजन्सीशी झाली. तिची उंची आणि आकर्षक व्यक्तिमत्व पाहून एजन्सीने तिला मॉडेलिंगसाठी साइन केले.

चित्रपट कारकिर्दीची सुरुवात

२०१३ मध्ये यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आणि वाणी रातोरात प्रसिद्ध झाली . २०१६ मध्ये वाणी कपूरला रणवीर सिंगसोबत 'बेफिकरे' चित्रपट मिळाला. या चित्रपटाने वाणीच्या कारकिर्दीला एक नवीन वळण दिले. पॅरिसच्या सुंदर ठिकाणी चित्रित केलेल्या तिच्या गाण्यांनी आणि बोल्ड स्टाईलने तिला एक वेगळी ओळख दिली. २०१९ मध्ये, वाणी कपूरने हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. जरी या चित्रपटातील तिची भूमिका जास्त नसली तरी, तिचे हृतिकसोबतचे 'घुंगरू' हे गाणे सुपरहिट ठरले. 'वॉर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आणि वाणीची लोकप्रियता नवीन उंचीवर पोहोचली.

वाणी कपूरची एकूण संपत्ती

माध्यमांनुसार, वाणी कपूरची एकूण संपत्ती सुमारे ४० कोटी रुपये आहे. तिच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट, मॉडेलिंग आणि जाहिराती आहेत. दिल्ली आणि मुंबईत तिची आलिशान घरे आणि गाड्या आहे.

Maharashtra Live News Update: - वाशिम शहरात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण द्वारका उत्सव

राज्यात स्पीड कंट्रोल मीटर घोटाळा; चालकांची मोठी फसवणूक|VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा हादरा! बडा नेता शिंदेसेनेत जाणार, माजी आमदारांचाही होणार पक्षप्रवेश

Goa Tourism : गोव्यात लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, 'या' समुद्रकिनाऱ्याला भेट द्याच

Municipal Elections: राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! महापालिका निवडणुकांसाठी आदेश, कानमंत्र आणि प्लानिंग

SCROLL FOR NEXT