uut marathi movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uut: 'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर; कान्स फेस्टिव्हल गाजलेला चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

uut marathi movie: व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

uut marathi movie: तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे.

'ऊत' या चित्रपटातील प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

यावेळी चित्रपटाला शुभेच्छा देताना अभिनेते मकरंद देशोपांडे म्हणाले की, ‘चित्रपट करणं हे कसब आहे. अनेकांची मेहनत यात असते. आज चित्रपटाला प्रेक्षक नसताना चित्रपट बनवण्याचं धाडस करणं कॊतुकास्पद आहे. या चित्रपटासाठी मला विचारणा झाली होती पण काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्याचा माझा योग जुळून आला नव्हता. पण आज या चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते झाले आणि या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

Sawan Somvar Upay: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बनतोय दुर्लभ संयोग; 'या' उपायांनी दूर होईल आर्थिक तंगी

Khanderi Fort : समुद्रात वसलाय सुंदर किल्ला, एकदा नक्कीच भेट द्या

Indian Railway : आता रेल्वे प्रवासात राहणार तुमच्यावर २४ तास नजर; जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT