Success Story of Dev Raturi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Success Story of Dev Raturi : चीनच्या शाळांमध्ये शिकवली जाते भारताच्या 'हिरो'ची गोष्ट, एकेकाळी करायचा वेटरचे काम

Dev Raturi Success Story: मुळचा भारतीय असलेल्या देव रतुरीने चीनमधील फिल्मी इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमवले.

Chetan Bodke

Indian Film Star In China

मुळचा भारतीय असलेल्या देव रतुरीने चीनमधील फिल्मी इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमवले. वेटर म्हणून काम करण्यासाठी चीनमध्ये गेलेल्या देवने आतापर्यंत 20 हून अधिक चीनी चित्रपट, टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हिंदुस्थान टाईम्स या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, देव हा भारतातील उत्तराखंडमधील रहिवासी आहे. 

४६ वर्षीय देव रातुरी हा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांचे खूप मोठे चाहते आहेत. चीनच्या फिल्मी दुनियेत आपल्याला कधी काम करण्याची संधी मिळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. त्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याच्या ऑफर आल्या आहेत. 

एवढंच नाही तर, शाळेत असताना नापास झालेल्या मुलाची कथा शालेय अभ्यासक्रमात घेतली जाईल, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. देवची सक्सेस स्टोरी शालेय अभ्यासक्रमात प्रेरणादायी कथा म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे. तेहरीच्या कमरसौद या छोट्याशा गावात राहणारा मुलगा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चीनमध्ये गेला.

१८ वर्षांपूर्वी तो भारतातून चीनमध्ये गेला होता. आज त्याची कथा शांक्सी प्रांतातील शिआन शहरातील शाळांमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना देव रतुरीची कथा शिकवली जात आहे. चिनी चित्रपट विश्वात मोठे यश संपादन करणाऱ्या देवचा जन्म उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील केमरिया सौर गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. 

चीनला जाण्यापूर्वी देवने भारतातही अनेक ऑडिशन्स दिल्या पण प्रत्येक वेळी त्यांची निराशा झाली. त्यानंतर देव भारतात मार्शल आर्ट शिकून चीनला रवाना झाला.

2005 मध्ये देवने बीजिंगमधील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले. देवने काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळाला मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीत देव म्हणतो, १०,००० रुपये मासिक पगारावर एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत असताना त्याने मंदारिन भाषा शिकली.

मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतल्याने मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिथल्या स्थानिक लोकांनी मला सांगितले की पुढच्या प्रशिक्षणासाठी मला शाओलिन मंदिर या प्रसिद्ध मठात जावे लागेल, जे मला परवडणारे नव्हते. माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती.

मी पुढील सात वर्ष कठोर खूप मेहनत घेतली आणि एका जर्मन रेस्टॉरंटचा व्यवस्थापक झालो. हळूहळू, मी व्यवसायात गेल्यानंतर अनेक व्यावसायिक रणनित्या शिकलो आणि २०१० मध्ये हॉस्पिटॅलिटी चेनचा एरिया डायरेक्टर झालो.

२०१३ मध्ये देवने चीनमध्येच रेड फोर्ट नावाने स्वतःचे रेस्टॉरंट उघडले. यानंतर देवला फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करण्याची संधी मिळाली. त्यावेळी देवला ‘स्वात’ चित्रपटात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात काम केल्यानंतर देवने मागे वळून पाहिले नाही. रतुरीची आज चीनमध्ये आठ रेस्टॉरंट आहेत. तो म्हणतो, मला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती फिल्म इंडस्ट्रीमुळेच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT