Hollywood च्या धर्तीवर साकारण्यात येणार Noida Film City  File Photo
मनोरंजन बातम्या

Hollywood च्या धर्तीवर साकारण्यात येणार Noida Film City

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या नोएडा फिल्म सिटीची रचना हॉलिवूड च्या धर्तीवर असणार असून, जागतिक दर्जाची आधुनिक फिल्म सिटी असणार आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोएडा : उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नोएडा फिल्म फिल्म सिटीची रचना हॉलिवूडच्या धर्तीवर असणारा असून या फिल्म सिटीच्या बांधकामाला वेग आला आहे. तब्बल 6 हजार कोटी खर्चून यमुना सिटीमधील एक हजार एकरमध्ये ही फिल्मसिटी तयार होईल. या फिल्मसिटीमध्ये सुमारे 15 हजार लोकांना रोजगार मिळेल. यमुना एक्स्प्रेस वे डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEEDA) च्या सेक्टर -21 मध्ये पीपीपी मॉडेलवर बांधण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) ला सरकारने मान्यता देखील दिली आहे. आता डीपीआर तयार करणारी कंपनी तीन आठवड्यात यासंबंधातील अहवाल तयार करून त्यानंतर जागतिक निविदा प्रसिद्ध केली जाईल. सर्व गोष्टी नियोजनानुसार झाल्या तर पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात फिल्म सिटीचे बांधकाम सुरू होईल. तीन टप्प्यांत विकसित होणाऱ्या या फिल्मसिटीच्या पहिल्या टप्प्यात फिल्म स्टुडिओ, ओपन एरिया, करमणूक पार्क, व्हिला इत्यादी तयार केले जातील.

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशच्या या पहिल्या चित्रपट नगरीत जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट केले जाणार आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या फिल्मसिटीचा मोठा भाग डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. चित्रपटांमधील डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे त्याला इन्फोटेनमेंट सिटी म्हटले जाईल. यामध्ये मालिका आणि चित्रपट, एनिमेशन, वेब सिरीज, कार्टून चित्रपट, माहितीपट, डिजिटल मीडिया इत्यादींच्या शूटिंगसाठी विशेष स्टुडिओसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. फिल्मसिटीमध्ये फिल्म प्रॉडक्शन स्टुडिओ, आउटडोअर लोकेशन्स, स्पेशल इफेक्ट्स स्टुडिओ, हॉटेल्स, क्लब हाऊस, गावे, कार्यशाळा, पर्यटक आणि मनोरंजन, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड कोर्ट, करमणूक पार्क, कन्व्हेन्शन सेंटर आणि पार्किंगची उभारणी केली जाईल. फिल्म सिटीच्या बांधकामासाठी डीपीआर तयार करण्यासाठी सरकारकडून एका नामांकित सल्लागार एजन्सीची निवड करण्यात आली आहे.

या डीपीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कोणत्या आर्थिक मॉडेलवर फिल्मसिटी बांधावी. यासाठी निधीची व्यवस्था करण्याचे सूत्र काय असेल? पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील फिल्मसिटीच्या बांधकामावरील खर्चाचा अंतिम तपशील आणि बांधकाम वेळेच्या मर्यादेचा तपशील देखील या डीपीआरमध्ये समाविष्ट असणार आहे. फिल्म सिटीचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि फिल्म सिटी मधून मिळकत आणि रोजगाराचा लेखाजोखा देखील DPR मध्ये नमूद करण्यात आला आहे. या फिल्म सिटीला पर्यटन स्थळ म्हणून कसे विकसित करता येईल यासंदर्भातला उल्लेख देखील या DPR मध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हि फिल्म सिटी पर्यटकांना नक्कीच आकर्षित करणार यात शंका नाही.

DPR बनवणाऱ्या कंपनीकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या या जागतिक निविदेत देशी आणि विदेशी कंपन्या देखील जागतिक निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. फिल्म सिटीची निर्मिती करणारी कंपनी दोन महिन्यांच्या आत निवडली जाईल. तीन टप्प्यांत विकसित होणाऱ्या फिल्म सिटीची निर्मिती करणारी कंपनी 31 डिसेंबरपर्यंत निवडली जाईल. फिल्म सिटी निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत 40 वर्षांचा करार असेल. प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात की, पहिल्या टप्प्यात चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित 80 टक्के भाग तयार केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात आदरातिथ्य, रिसॉर्ट आणि इतर व्यावसायिक उपक्रम विकसित केले जातील. किरकोळ विकास हा तिसऱ्या टप्प्यात होईल. या फिल्म सिटीमध्ये 3D स्टुडिओ असतील. 360 अंशांवर फिरणारे सेट असतील. ध्वनी रेकॉर्डिंग, संपादन आणि अनिमेशन स्टुडिओ देखील असतील. येथे एक फिल्म युनिव्हर्सिटी बांधण्यात येणार असून विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीच्या आधुनिक तंत्राचे शिक्षण येथे मिळणार आहे. चित्रपटांशी संबंधित विषयांवर संशोधनही विद्यार्थ्यांना करता येईल. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित सर्व सुविधा येथे असणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT