Uttam Singh talks about the makers of 'Gadar 2'
Uttam Singh talks about the makers of 'Gadar 2' Saam TV
मनोरंजन बातम्या

Uttam Singh On Gadar 2: 'गदर 2'च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप; संगीतकाराची फसवणूक करून वापरली गाणी

Pooja Dange

Gadar Movie Composer Uttam Singh:

सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटाला देशातच नाहीतर जगभरात यश मिळत आहे. दरम्यान, संगीतकार उत्तम सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 2'च्या टीमवर त्यांच्या मुख्य ट्रॅक सिक्वेलमध्ये वापरल्याचे सांगत फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे.

उत्तम यांनी चित्रपटातील 'मैं निकला गड्डी लेके' आणि 'उड जा काले कावा' ही गाणी संगीतबद्ध केली आहेत, जी संगीत दिग्दर्शक मिथुन यांनी रिक्रिएट केली आहेत.

'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीत संगीतकार उत्तम सिंग यांनी सांगितले आहे, 'गदर 2 साठी त्यांनी मला फोन केला नाही आणि मला फोन करून काम मागवायची सवय नाही.

माझी दोन गाणी त्यांनी चित्रपटात वापरली आहेत आणि माझे पार्श्वसंगीतही त्यांनी वापरले असल्याचे मी ऐकले आहे. माझी गाणी चित्रपटात वापरण्याआधी एकदा तरी मला विचारण्याचे मॅनर त्यांच्याकडे असले पाहिजेत.'

गदर 2 हा अनिल शर्माच्या 2001 मध्ये आलेल्या गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी तारा सिंग आणि सकिना यांच्या भूमिका गदर २ मध्ये पुन्हा केल्या आहेत.

अनिलचा मुलगा उत्कर्ष शर्मा यानेही या चित्रपटात जीतेची भूमिका साकारली आहे. 'गदर 2' ही तारा सिंगच्या मुलगा चरणजीत सिंगला पाकिस्तानी सैन्यापासून वाचवण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या प्रवासाची ही कथा आहे. 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने जवळपास 411.10 कोटींची कमाई केली आहे. (Latest ENtertainment News)

अलीकडेच, सनी देओलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानले आणि डोळ्यात आनंदाश्रू आणत म्हटले, 'गदर 2 ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं.

आम्ही 400 कोटींचा आकडा पार केला आहे आणि आणखी पुढे जाऊ. हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झाले. तुम्हा सर्वांना चित्रपट आवडला. तारा सिंग, सकिना आणि संपूर्ण कुटुंबावर तुम्हा सर्वांचे प्रेम होते. धन्यवाद.'

'गदर २' चित्रपटाने देशभरात ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट भारतात देखील ५०० कोटींचा आकडा पार करेल, अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT