तबल्यावर आपल्या जादुई बोटांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची बोटं तबल्यावर पडत्याच क्षणी प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ला झाला. त्या काळातील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे ते मुलगा आहेत.. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या कलेने त्यांना फार मोठी प्रसिद्धी दिली आहे. आज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
झाकीर हुसेन यांचं खरं आडनाव कुरेशी आहे, परंतु त्यांना हुसैन हे आडनाव देण्यात आले आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७ व्या वर्षी आपली पहिली मैफल केली होती. झाकीर यांनी १९८९ मध्ये 'हीट अँड डस्ट' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी त्या पहिल्या वहिल्या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही तर त्यासाठी संगीतही दिले.
२०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. झाकीर हुसैन हे व्हाईट हाऊसमध्ये आपली कला सादर करणारे पहिले भारतीय संगीतकार होते.
झाकीर हुसैन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोलाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.
झाकीर हुसैन १२ वर्षांचे होते. त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत एका कॉन्सर्टला गेला होता. त्या कार्यक्रमाला पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, अल्लाह राखा खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज सारख्या संगीत दिग्गजांनी मैफलीला हजेरी लावली होती. अल्लाह राखा खानसोबत झाकीरही मंचावर गेले होते. त्यावेळी त्यांनी स्टेज परफॉर्मन्स देखील केला. त्यानंतर झाकीरला ५ रुपये बक्षिस म्हणून मिळाले होते. 'मी खूप पैसे कमावले. पण ते रुपये माझ्यासाठी खूप मौल्यवान राहिले.' असं झाकीर हुसैन एका मुलाखतीत म्हणाले होते.
उस्ताद झाकीर हुसेन हे एक भारतीय तबलावादक, संगीतकार आणि संगीत निर्माता आहेत. त्यांना भारत सरकारकडून १९८८ मध्ये पद्मश्री तर २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर झाकीर यांना १९९० मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ म्युझिक आणि डान्स अँड ड्रामा ऑफ इंडियाकडून संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता. तर १९९९ मध्ये, झाकीर यांना ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल एन्डोमेंट फॉर द आर्ट्स’कडून नॅशनल हेरिटेज फेलोशिप देण्यात आली होती. हा पुरस्कार पारंपारिक कलाकारांना आणि संगीतकारांना दिला जातो. या पुरस्काराची सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणती केली जाते. तर दोन वेळा ग्रॅमी अवॉर्डही त्यांना मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.