Urvashi Rautela SAAM TV
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Urvashi Rautela Talk On Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने क्रिकेटर ऋषभ पंतसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपले मौन सौडले आहे. वाचा उर्वशी काय म्हणाली.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. उर्वशी तिच्या चित्रपट आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सध्या सोशल मीडियावर उर्वशी आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. यावरून चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. अभिनेत्री उर्वशीने आता यावर मौन सोडले आहे.

उर्वशीने क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या नात्यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ती एका मिडिया मुलाखतीत म्हणाली की, "मी माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य देते. माझे सर्व लक्ष माझ्या करिअरवर आणि माझ्या आवडत्या माणसांवर आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. ती तिची प्रायव्हसी जपते. "

उर्वशीने यातून तिचं आणि ऋषभ पंतच नातं हे एक अफवा असल्याचे सांगितले आहे. ती तिच्या करिअरमधील लक्ष विचलित होऊ देणार नाही. चांगल्या लोकांसोबत ती पुढे जाणार असे उर्वशी म्हणाली.

ऋषभ पंतसोबत वारंवार पसरलेल्या अफवांमुळे उर्वशी नेहमी चर्चेत असते. जेव्हा अभिनेत्रीने 2022 मध्ये सांगितले की, तिला विशिष्ट 'RP' मुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागली होती, तेव्हा लोकांनी असे मानले की हे क्रिकेटर ऋषभ पंतसाठी आहे. ऋषभ पंतसाठी उर्वशी थांबली होती. तेव्हा सर्व लोकांना असे वाटले की, क्रिकेटर ऋषभ पंतसाठी अभिनेत्री वाट पाहत आहे. पण यावेळी ऋषभ पंत मात्र ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या मॅचसाठी गेला होता. चाहत्यांच्या या गैरसमजावर अभिनेत्रीने आपले मत स्पष्ट केले. तिच्या आयुष्यातील रिअल 'RP' म्हणजे राम पोथीनेनी आहे. जो उर्वशीचा सहकलाकार आहे.

नुकतीच उर्वशी 'कॉल मी बे' या वेब सीरीजमध्ये अन्नया पांडेसोबत काम करताना दिसली. अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लवकरच उर्वशी एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT