भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचा बिगुल वाजला आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत रंगणार आहे.
या सामन्यासाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात वेगवान गोलंदाज यश दयालचं देखील नाव आहे. गेल्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगने त्याच्या एकाच षटकात ६ षटकार खेचले होते.
यश दयालने आयपीएल २०२३ स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. मात्र एका षटकामुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागण्याची वेळ आली होती. यश दयाल आयपीएल २०२३ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळत होता.
त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगने खणखणीत ५ षटकार खेचत त्याला विजय मिळवून दिला होता. या सामन्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे त्याचं ४ ते ५ किलो वजन कमी झालं होतं. मात्र त्याने माघार न घेता, दमदार कमबॅक केलं.
या फ्लॉप कामगिरीनंतर गुजरात टायटन्सने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला ५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.
त्यानंतर त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये त्याने १५ गडी बाद केले. यादरम्यान निर्णायक षटक टाकत संघाला विजय सुद्धा मिळवून दिला. टी -२० क्रिकेटमध्ये राडा घातल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर त्याची बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.