Urmila Motondkar Lovestory Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar Love Story: वयात १० वर्षांचा फरक अन् आंतरजातीय विवाह; अशी होती उर्मिला मांतोडकरची लव्हस्टोरी

Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडरकरची लव्हस्टोरी जाणून घ्या.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने चित्रपटसृष्टीत तिचं अनोख स्थान निर्माण केलं आहे. उर्मिला मातोंडकर सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आज अभिनेत्री उर्मिलाची गणना टॉपच्या सेलिब्रिटींमध्ये केली जाते. 'रंगीला' या चित्रपटाने उर्मिलाला खरी ओळख मिळवून दिली. उर्मिलाने चित्रपटातील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेसृष्टीत नाव केल्यानंतर अभिनेत्री तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. उर्मिलाचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. उर्मिला लग्नादरम्यान अनेक अडचणींचा समोर जावे लागले होते.अशातच आता अभिनेत्री उर्मिला मातोंडरकरने चाहत्यांना दु:खद धक्का दिला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसिनसोबत घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती मिळाली आहे.

कुठे अन् कशी झाली होती उर्मिला अन् मोहसिन यांची भेट

उर्मिला उर्मिला आणि मोहसिन अख्तर हे दोघे पहिल्यांदा २०१४ मध्ये प्रसिद्ध ड्रेस डिझाईनर मनिष मल्होत्राची पुतणी रिद्धी मल्होत्राच्या लग्नात भेटले. पहिल्या भेटीतच मोहसिनला उर्मिला ही आवडू लागली. केवळ १ वर्ष मोहसिनने उर्मिलाशी बोलण्याचा प्रयत्न मोहसिनने केला होता. त्यानंतर दोघांची भेट देखील झाली. मोहसिन हा उर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.

एकमेकांवर अपार प्रेम करणारे उर्मिला आणि मोहसिन यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला. मात्र लग्नाचा विचार केल्यानंतर या दोघांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोहसिन हा उर्मिला पेक्षा १० वर्षाने लहान असून मुस्लिम आहे. वय आणि धर्माचा कोणताही विचार न करता उर्मिला वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसिनशी विवाहबंधनात अडकली. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही पद्धतीनुसार उर्मिला-मोहसिनने लग्न केलं. २०१६ मध्ये अत्यंत कमी लोकांमध्ये कुटुंबियांच्या उपस्थित या दोघांनी लग्न केले. इंडस्ट्रीतून केवळ मनिष मल्होत्रा या लग्नात उपस्थित होता. उर्मिलाने मोहसिनच्या प्रेमासाठी धर्म आणि वयाचे बंधन झुगारून लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT