Urfi Javed At Police Station Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed At Police Station: आक्षेपार्ह कपडे घातल्याने उर्फी विरोधात तक्रार, सुनावणीला पोहोचली फाटक्या जीन्समध्ये; पाहा VIDEO

Urfi Javed: उर्फी बांद्रातील पोलीस स्टेशन बाहेर स्पॉट झाली आहे.

Pooja Dange

Urfi Javed Viral Video:

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशनने सगळ्यांना आश्चर्यचकित करते. परंतु यामुळे उर्फी तितकीच ट्रोल देखील होते.

अनेकदा ट्रोल होऊनही उर्फीने विचित्र कपडे घालणं सुरूच ठेवलं आहे. उर्फी जावेद पून्हा एकदा पापाराझींच्या कॅमेरात स्पॉट झाली आहे. उर्फी बांद्रातील पोलीस स्टेशन बाहेर दिसली आहे.

बांद्रा पोलीस स्टेशन बाहेरील उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. उर्फी जावेद खूप घाईघाईत गाडीतून उतरली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाताना दिसत आहे.

पोलीस स्टेशनमधून जाताना देखील उर्फीने जाताना जे कपडे घातले होते त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने पिंक टी-शर्ट आणि त्यावर डार्क ग्रीन रंगाचा कोट घातला होता. उर्फीच्या कोटच्या मागे पिंक रंगाने 'डॉन को पकडना..' असं लिहिलं होतं. उर्फीचे जीन्सची फक्त आऊटलाईन होती.

उर्फीने पोलीस स्टेशनला जाताना असा कोट का घातला होता असं प्रश्न उर्फीला पाहून तुम्हालाही पडेल. उर्फीच्या या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत पुन्हा तिला ट्रोल करत आहेत. 'पोलीस स्टेशनमध्ये तरी पूर्ण कपड्यात यायचं', 'ही बाई काही सुधारणार नाही. हिला काहीच कास वाटत नाही', अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

उर्फी जावेद पोलीस स्टेशनमध्ये का गेली?

उर्फी जावेद विरोधात आक्षेपार्ह कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जात असल्याचा आरोप आहे. तिच्यावरील या आरोपावर या पहिली सुनावानै होती. त्यासाठी उर्फी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती.

उर्फी जावेद पोलीस स्टेशनमध्ये विचित्र कपड्यांमध्ये गेल्याने पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाणावर आली आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रा वाघ भाजप नेत्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी उर्फी विरोधात अनेक वक्तव्ये केली होती. या दोघींचा ट्विटरवर कोल्ड वॉर सुरू होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT