Sumona Chakravarti Dance: दुर्गा पूजेत धुनुची घेऊन सुमोना चक्रवर्तीने धरला ठेका; VIDEO व्हायरल

Sumona Chakravarti In Durga Puja: कपिल शर्मा शोमधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sumona Chakravarti Dhunuchi Dance Video
Sumona Chakravarti Dhunuchi Dance VideoInstagram
Published On

Sumona Chakravarti Dance Video In Durga Puja Goes Viral:

देशभरात नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करण्यात भाविक दंग झाले आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी देखील नवरात्रोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

मुखर्जी कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक दुर्गा पूजेचे आयोजन केले आहे. अनेक कलाकार तेथे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. इशिता दत्ता, वत्सल सेठ, कियारा अडवाणी, हेमा मालिनी, ईशा देओल, काजोल, राणी मुखर्जीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूड कलाकारांसह टीव्ही कलाकार देखील दुर्गा पूजेत सहभागी झाले होते. दरम्यान कपिल शर्मा शोमधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुमोना धुनुची डान्स करताना दिसत आहे.

सुमोनाने धुनुची तोंडात पकडून डान्स करत आहे. ढोल-नागाड्यांच्या तालावर सुमोनाने ठेका धरला आहे. सुमोनाला धुनुची घेऊन डान्स करताना पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सुमोना वेगवगेळ्या पद्धतीने धुनुची धरत अप्रतिम डान्स करत आहेत.

दुर्गा पूजेतील सुमोनाचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लाल रंगाची साडी सुमोना सुंदर दिसत आहे. नेटकरी सुमोनाचे कौतुक करत आहेत. (Latest Entertainment News)

यादी अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील धुनुची डान्स करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुष्मिता तिच्या मोठ्या मुलीसोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली होती. दर्ण्यं दोघींनीही धुनुची डान्स आनंद लुटला.

अभिनेत्री राणी मुखर्जीचा देखील दुर्गा पूजेदरम्यान डान्स करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. राणी मुखर्जी तिच्या कुटुंबियांसह देवी मातेच्या मंडपात त्यांचा पारंपरिक डान्स करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com