Urfi Javed Distributed Bags To Paparazzi  Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Video : पुन्हा दिसला उर्फीचा दिलदारपणा... भर पावसात पापाराझींना वाटल्या बॅग

Urfi Javed Helping Paparazzi : उर्फी जावेद भर पावसात भिजून बॅग वाटत आहे.

Pooja Dange

Urfi Javed Gave Bags To Paparazzi : उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिची अतरंगी स्टाईल लोकांचे लक्ष वेधून घेते. यामुळे अनेक अडचणींना उर्फीला तोंड द्यावे लागते. असे असले तरी उर्फी तिचे काम करत असते.

उर्फी जशी बोल्ड, बिनधास्त आहे, तशीच ती वागते देखील, तिला ट्रोल करणाऱ्यांना उर्फी सडेतोड उत्तर देते. या या उर्फीची एक दुसरी बाजू देखील जी आपण अनेकदा पाहिली असेल पण कदाचित लक्षात राहिली नसेल. पुन्हा एकदा उर्फीचा दिलदारपणा दिसून आला आहे. (Latest Entertainment News)

उर्फीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी तिचे फोटो काढण्यासाठी किंवा कलाकारांचे फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या पापाराझींना गिफ्ट दिले आहे. उर्फीने पापाराझींना ब्लॅक कलरची बॅग गिफ्ट केली आहे. तिच्या हा बॅग देतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद भर पावसात भिजून बॅग वाटत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी त्या बॅगेचे वैशिष्ट्य देखील सांगताना दिसत आहे. उर्फी पापाराझींना म्हणते की, मी आज तुम्हाला बॅग देण्यासाठी आली आहे. या बॅगेला चार्जेर अटॅच आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही.' दरम्यान पापाराझीं तिला फोटो काढण्यासाठी विनंती करत होते.

उर्फीने यावेळी मँगो कलरचा ड्रेस घातला होता. त्यावर काळ्या आणि सफेद रंगाची डिजाईन होती. तर पायात पेन्सिल हिल्स घातले होते.

उर्फी या आधी देखील लोकांची मदत करताना दिसली आहे. उर्फीने एकदा मूक-बधिर मुलांच्या कॅफेला भेट दिली होती. तर रस्त्यावरील गरीब मुकांना देखील तिने मदत केली होती. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

SCROLL FOR NEXT