Urfi Javed And Chitra Wagh
Urfi Javed And Chitra Wagh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: आता तर हद्दच झाली! उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले, म्हणते; 'चित्रा ताई मेरी...'

Chetan Bodke

Urfi Javed: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपण्याचे काही नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिच्यावर टीका केली होती. उर्फीला असं कमी कपड्यात रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका यावेळी चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर घेतली होती.

यानंतर उर्फीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मैं होनेवाली मेरी सास है” अशा शब्दांत उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याच्या आरोपाखाली उर्फीविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकात जाऊन उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती.

कालच उर्फीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना डिवचत एक ट्वीट केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कमालीची चर्चा होत आहे. काल उर्फीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांना डिवचत एक ट्वीट केले होते. उर्फी ट्वीटमध्ये म्हणते, "मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू" असं म्हटली होती.

यावरुन उर्फीला पुन्हा एकदा नेटकरी ट्रोल करीत आहेत. तिच्यासाठी ट्रोलिंग काही नवीन नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT