Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: फॅशनिस्टा उर्फी जावेदच्या 'सिमकार्ड' लूकची होतेय सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

उर्फी जावेदने सोशल मीडियावर नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. उर्फी तिच्या प्रत्येक लूक मधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असते. अनेक सोशल मीडिया युजर्स तिच्या बोल्डनेसचे कौतुक करतात तर अनेक युजर्स तिला ट्रोल देखील करतात. सोशल मीडियावर अतरंगी आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेदने तिच्या नवीन लूकने खळबळ उडवली आहे. सध्या उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे प्रकाशझोतात येत आहे. नेहमीच काय तरी हटके लूक करून चाहत्यांमध्ये राहणाऱ्या उर्फीने सिमकार्ड ड्रेस परिधान केला आहे. उर्फीच्या नवीन लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नवीन लूकचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या नवीन लूकची कोणी कल्पना देखील केली नसेल तर, उर्फीने चक्क आता सिमकार्ड ड्रेस परिधान केला आहे. पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या सिमकार्ड ड्रेस परिधान करून उर्फीने हटके पोज दिल्या आहेत. यासह उर्फिने केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे. उर्फीने सोशल मीडियावर तिचा सिमकार्ड लूक पोस्ट करत 'हा सिमकार्ड पासून बनवलेला ड्रेस तुम्हाला खरं वाटेल का?' असं म्हटलं आहे.

उर्फी जावेद ही फॅशन आयकॉन म्हणुन ओळखली जाते. उर्फीचा सिमकार्ड स्कर्ट आणि टॉप आउटफिट सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेतो आहे. माहितीनुसार, उर्फीच्या संपूर्ण ड्रेसवर सिमकार्ड लावले आहेत. उर्फीचा हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल २ हजार सिमकार्ड वापरण्यात आले आहेत. उर्फी जावेद नेहमीच तिच्या लूकमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवते. उर्फी स्वत: तिचे ड्रेस डिझाईन करते. आतापर्यंत उर्फीने ब्लेड, फोटो, फुलं, साखळ्या, दगड, पिशव्या, गोणी, प्लॅस्टिक, वायरपासून बनवलेले ड्रेस परिधान केले आहेत. अनेकदा उर्फी तिच्या विचित्र कपड्यामुळे इंटरनेटचा पारा वाढवते.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

SCROLL FOR NEXT