Urfi Javed In MTV Splitsvilla X4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4'मध्ये उर्फी जावेद घेणार तिच्या जोडीदाराचा शोध

उर्फी जावेद आपल्याला 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' मध्ये दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed New Show Update: 'बिग बॉस ओटीटी'मधून प्रसिद्धी झोतात आलेली उर्फी जावेद सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. उर्फी तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो. परंतु उर्फी तिच्या सडेतोड बोललण्याने ट्रोल्सची तोंडही बंद करते. उर्फी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये जास्त काळ टिकू शक्ती नाही. मात्र आता ती तिच्या दुसऱ्या रिअॅलिटी शोसाठी सज्ज झाली आहे. उर्फी जावेद आपल्याला 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' मध्ये दिसणार आहे.

'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4'शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये उर्फी जावेद सर्व स्पर्धकांवर रागावताना दिसत आहे. उर्फी शोमधील सर्व स्पर्धकांना रागाने म्हणते, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलत आहात? प्रोमो पाहून असाही अंदाज येत आहे की, उर्फीला कदाचित या शोमध्ये कोणतीतरी महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. प्रोमोमध्ये उर्फीला पाहिल्यानंतर तिचे चाहतेही आनंदी झाले आहेत. (TV)

'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' मध्ये सहभागी झाल्यानंतर उर्फी जावेद तिची प्रतिक्रिया दिली आहे, 'मी बर्‍याच वर्षांपासून 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' ला फॉलो करत आहे आणि या डेटिंग रिअॅलिटी शोचा भाग बनणे म्हणजे वेड लागण्यासारखे आहे. हा शो तुमच्यासाठी योग्य जोडीदार निवडण्याविषयी आहे. मी खूप रोमँटिक आहे, त्यामुळे मला या शोचा भाग व्हायचे होते यात शंका नाही.' (Actress)

'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' या सीझनमध्ये रणविजय सिंग सनी लिओनीसोबत दिसणार नाही. तर त्याच्याऐवजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सानी लिओनीसोबत दिसणार आहे. रणविजय सिंह अनेक वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन करत होता, परंतु यावेळी काही कारणांमुळे तो हा शो करू शकला नाही. 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4' 12 नोव्हेंबरपासून वूट आणि एमटीव्ही प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; आता क्रीडा खातं कोणाकडे? जाणून घ्या

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT