Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: का लपवते उर्फी चेहरा; व्हिडिओ चर्चेत

सध्या उर्फीचा लेटेस्ट लूक खूपच चर्चेचा विषय ठरला असून ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे. पण लूकची खासियत अशी की, त्यात उर्फीचा चेहेराच दिसत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत असते. तिच्या दररोजच्या फोटोमुळे, काही तरी हटके व्हिडिओमुळे तर कधी कॉन्ट्रोवर्शियल स्टाईलमुळे ती दररोज चर्चेचा मुद्दा असते. सध्या उर्फीचा लेटेस्ट लूक खूपच चर्चेचा विषय ठरला असून ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे. पण लूकची खासियत अशी की, त्यात उर्फीचा चेहेराच दिसत नाही. उर्फीचा हा लूक काहीसा ९० च्या दशकातील डिस्को बॉल्सपासून बनवल्याचे दिसत आहे.

या फोटोत उर्फीने स्वत:चा चेहरा झाकून ठेवलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, उर्फीचा हा फोटो पाहता राज कुंद्राची स्टाईल मारताना दिसत आहे. वास्तविक, राज कुंद्रा अनेकदा मीडियासमोर आपला चेहेरा झाकण्याच्या प्रयत्नात असतो. उर्फीने यावेळीही असेच काहीसे केले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना उर्फीने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, 'दर्द ए डिस्को, या फोटोत मेकअप आणि हेयरला काय श्रेय देऊ.'

उर्फीहे पहिल्यांदा करत नसून ती नेहमीच काही तरी विचित्र करण्याच्या प्रयत्नात असते. याआधी उर्फीने कधी वीजेची तार, दगड, सिमकार्ड तर कधी झाडाचे पानं फुलंही गुंडाळत कधी सेल्फी तर कधी फोटो काढण्याच्या तयारीत असते. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज 'जमतारा 2' च्या स्टारकास्ट डिझायनरने तिला सिमकार्डने बनवलेला ड्रेस विकून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ब्रेकिंग न्यूज, जावेदसोबत उर्फीची फसवणूक झाली आहे. आता प्रत्येकाचा नंबर येईल." सुमारे 2 हजार सिम कार्ड चिपकवत हा पोशाख तयार केला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा उर्फी हा पोशाख घालून सेल्फी काढते तेव्हा पोलिस तिच्या घरी येतात, जे तिला सांगतात की हे सर्व सिम फसवणूकीचे आहेत.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT