Urfi Javed Controversy  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: उर्फी जावेद-चित्रा वाघ यांच्यातील वाद संपेना; आता उर्फी घेणार रुपाली चाकणकरांची भेट

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Controversy: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. उर्फीवर महिला आयोग का तक्रार दाखल करत नाही? चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर असा सवाल उपस्थित केला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. आता यावर आरोप-प्रत्यारोप होत असताना उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी उर्फी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

यावेळी तिच्या सोबत तिचे वकील देखील असणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटण्याचा सल्ला यावेळी तिच्या वकीलांनीच तिला दिला आहे. नुकताच उर्फीने महिला आयोगाला तक्रार अर्ज पाठवला असून हा वाद अजून किती दिवस चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फीवरुन चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला काही प्रश्न विचारले होते. त्यावर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसीवर चित्रा वाघ म्हणतात, “मला असे 56 नोटीस रोज येत असतात. त्यात अजून एक आली. त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तरसुद्धा मी दिलेलं आहे. माझा आक्षेप आयोगावर नाही, तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे.”

“त्यांना पाठवलेली नोटीस त्यांनी नीट वाचली असती, तर असे प्रश्न चित्रा वाघ यांना पडलेच नसते. त्यांचा त्यावरील थोडा अभ्यास कमी असल्याने हे प्रश्न विचारले असतील. समाजामध्ये खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याविषयी ही नोटीस बजावली आहे.” असा पलटवार चाकणकर यांनी केला.

तर उर्फी ट्विटर अकाऊंटवरून चित्रा वाघ यांच्याबद्दल काहीतरी नेहमी पोस्ट लिहित असते. तिचे हे ट्वीट्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. ‘चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली सास है’अशा आशयाचे विचित्र ट्विट्स सध्या उर्फी सोशल मीडियावर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT