Upcoming Marathi Movies
Upcoming Marathi Movies  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Upcoming Marathi Movies: आगामी वर्षात प्रेक्षकांसाठी खास भेट; वेगवेगळ्या धाटणीच्या सात चित्रपटांची घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी चित्रपटांची उत्तम मांडणी, कथेचा उत्तम जोड, चांगले दिग्दर्शन, सादरीकरणाची वेगळीच जोड, चित्रपटाची निर्मिती अशा सर्व घटकांना एकत्रित करत मराठी चित्रपट चांगलेच नाव कमवत आहे. साता समुद्रापार मराठी चित्रपटाची महती आपण सर्वांनीच पाहिलीच आहे. अनेक मराठी चित्रपटांचे शूटिंग परदेशात चालू आहे, त्यामुळे नक्कीच चित्रिकरणात वेगळा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार. मुंबईत बुधावारी पार पडलेल्या एका शानदार, रंगारंगा कार्यक्रमात एक-दोन नाही तब्बल सात मराठी चित्रपटांच्या घोषणा करण्यात आले. मराठीसह हिंदी चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती केलेले पारितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अॅंड पिक्चर्स प्रॉडक्शन्स तसेच एस. आर एन्टरप्रायजर्स या दोघांनी एकत्रित निर्मिती करत सात नव्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली. चित्रपटांचे दिग्दर्शक चित्रपट क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक एकत्र येत अभिनय क्षेत्रात कसलेल्या कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. मनोज अवाना चित्रपटाचे सहनिर्माते असून सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाईन निर्माते आहेत.

'निरवधी', 'सुटका', 'एप्रिल फुल', 'फक्त महिलांसाठी', 'थ्री चिअर्स', 'एकदा येऊन तर बघा' आणि 'ती मी नव्हेच' या सात चित्रपटांची एकत्र घोषणा करण्यात आली आहे. 'निरवधी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकरांकडे असून चित्रपटात सुबोध भावे, उपेंद्र लिमये, गौरी इंगवले हे कलाकार दिसणार आहेत. 'सुटका' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार असून स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि ओंकार राऊत मुख्य भूमिकेत आहेत.

थ्रिलर चित्रपट असलेला 'एप्रिल फुल' चे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहे तर मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधव, अंकित मोहन, रसिका सुनिल आणि रिंकू राजगुरु हे आहेत. महिलांची तगडी स्टारकास्ट असलेला 'फक्त महिलांसाठी' चित्रपटाच्या दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी आहेत तर चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रंगोळे, वंदना गुप्ते आणि प्रसाद ओक कलाकार आहेत. 'थ्री चिअर्स' चे लेखन दिग्दर्शन पारितोष पेंटर यांनी केले आहे तर सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी , रेशम टिपणीस, विजय पाटकर आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर झळकणार आहेत.

'एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली असून चित्रपटातून मोठया पडद्यावर दिग्दर्शकक्षेत्रात पदार्पण करीत आहे. यात सयाजी शिंदे, गिरिश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, राजेश शिरसाटकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार बघायला मिळणार आहेत. परितोष पेंटर यांच्या लेखनीतून उतरलेल्या 'ती मी नव्हेच' या चित्रपटात श्रेयस तळपदे, निनिद कामत आणि उर्मिला मातोंडकर हे बॉलिवूड गाजवणारे कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

यातील सर्व चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महिलांवर आधारित हे चित्रपटांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT