Falguni Pathak: फाल्गुनी पाठकच्या नव्या गाण्यावर प्रेक्षक थिरकणार; पाहा'गरबा क्विन'चा जीवनप्रवास

'गरबा सॉंग क्विन' म्हणून प्रचलित असलेली गायिका फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर सेलिब्रेशन होणार नाही असे सहसा कधी होणार नाही.
Falguni Pathak
Falguni Pathak Instagram/ @falgunipathak12

मुंबई: लवकरच येत्या काही दिवसात शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratrotsav) तोंडावर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. मुंबई (Mumbai) आणि परिसरात तर गायक आणि कार्यक्रमाला होणारी गर्दी खूपच लक्ष वेधते. नवरात्रीच्या नऊ दिवस संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असते सोबतच हर्षोल्हासात सर्वच गरब्याच्या गाण्यावर थिरकत असतात. 'गरबा सॉंग क्विन' म्हणून प्रचलित असलेली गायिका फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर सेलिब्रेशन होणार नाही असे सहसा कधी होणार नाही. फाल्गुनी यांच्या गाण्यांवर नवरात्रीत अख्खा देश ठेका धरत असतो. तेवढेच फाल्गुनीच्या गाण्यांना चाहते पसंती दर्शवतात.

Falguni Pathak
Munawar Faruqui Break Up: मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप; सोशल मीडियावर केले अनफॉलो

आज आपण फाल्गुनी यांच्या जीवनप्रवासावर थोडक्यात प्रकाशझोत टाकणार आहेत. 'गरबा सॉंग क्विन'चा जन्म १२ मार्च १९६४ रोजी मुंबईत झाला. फाल्गुनीने (Falguni Pathak) फक्त कार्यक्रमात गायली नसून अनेक प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये (Hindi Televison) गायली आहे. 'तारक मेहेता का उल्टा चश्मा', 'स्टार इंडिया धूम', 'बा बहू और बेटी', या कार्यक्रमांमधून आपली कलाकृतीही सादर केली आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी स्टेज परफॉर्मन्स सादर करत दहाव्या वर्षी पहिले गाणे रेकॉर्ड केले आहे. फाल्गुनी गायिका नसून परफॉर्मरही आहे.

फाल्गुनी पाठकचे 'गरबा साँग क्विन' असे नाव प्रचलित आहे. फाल्गुनीच्या अल्बम्समधील गाण्यांवर लोक गरबा आणि दांडिया खेळतात. ओढणी ओढू, परी हूँ मै, राधाने श्याम या फाल्गुनीच्या गाण्यांवर गरबा आणि दांडिया अनेक लोक खेळतात. नुकतेच तिचे वासलडी हे गाणे रिलीज झाले आहे. यंदा फाल्गुनीच्या या गाण्यावर लोक नक्कीच थिरकतील. ओ पिया, याद पिया की आने लगी, मैने पायल है छनकाई या फाल्गुनीच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com