Rahul Chopda Playing Nitin Gadakari Role Instagram
मनोरंजन बातम्या

Gadkari Movie: ‘हायवेमॅन’च्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, फर्स्ट लूक रिलीज

Rahul Chopda In Gadkari Movie: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘गडकरी’ चित्रपटात भूमिका कोण साकारणार आहे? हे स्पष्ट झालं आहे.

Chetan Bodke

Rahul Chopda Playing Nitin Gadakari Role

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘गडकरी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांनाच गडकरींच्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल? याची उत्सुकता होती. नुकताच चित्रपटाचा आगामी पोस्टर प्रदर्शित झाला असून नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली.

ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याची घोषणा झाली. चित्रपटात गडकरींच्या भूमिकेत राहुल चोपडा दिसणार आहे. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ऐश्वर्या डोरले दिसणार आहे.

या व्यतिरिक्त चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराच्या भूमिकेत तृप्ती प्रमिला केळकर दिसणार आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘गडकरी’ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT