Udit Narayan Google
मनोरंजन बातम्या

Udit Narayan : 'कुछ भी हो सकता था' ; राहत्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे उदित नारायण चिंतेत

Udit Narayan Home : उदित नारायण यांच्या स्कायपॅन अपार्टमेंट या इमारतीला रात्री अचानक आग लागली. या घटनेत एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तिचा मृत्यू झाला त्यामुळे या घटनेनंतर गायक खूपच घाबरले आहे.

Shruti Vilas Kadam

Udit Narayan : मुंबईतील अंधेरी येथील ओबेरॉय कॉम्प्लेक्समधील 13 मजली स्काय पॅन बिल्डिंगच्या 11व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही तीच इमारत आहे ज्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण राहतात. आग बी-विंगमध्ये लागली, तर उदित नारायण ए-विंगमध्ये राहतात. या घटनेनंतर ते खूप घाबरले आहेत. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारत धुराच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत आहे. मात्र, या अपघातात उदित नारायण किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतीही हानी झाली नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग फ्लॅटमधील विजेच्या तारा, विद्युत उपकरणे आणि घरातील वस्तूंपुरती मर्यादित होती. प्राथमिक तपासात अग्निशमन दलाने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला असला तरी नेमके कारण शोधले जात आहे. मंगळवारी पहाटे 1:49 वाजता जवळपास चार तासांनंतर आग विझवण्यात आली. या घटनेनंतर उदित नारायण चांगलेच घाबरले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केल्याचे गायकर यांनी सांगितले.

'सुदैवाने आम्ही सुरक्षित आहोत'

या प्रकरणावर ते म्हणाले, 'रात्री नऊच्या सुमारास आग लागली. मी ए-विंगच्या 11व्या मजल्यावर राहतो आणि बी-विंगमध्ये आग लागली. आम्ही सगळे खाली आलो आणि तीन चार तास इमारतीच्या आवारात थांबलो. हे खूप धोकादायक होते, काहीही होऊ शकते. देव आणि आमच्या हितचिंतकांचे आभार, आम्ही सुरक्षित आहोत.

'जेव्हा ते स्वतःच्या बाबतीत घडते तेव्हा तुम्हाला समजते'

या घटनेमुळे माझ्यावर मानसिक परिणाम झाला असून यातून सावरायला वेळ लागेल, असेही ते पुढे म्हणाले. जेव्हा तुम्ही अशा घटनेबद्दल ऐकता तेव्हा तुम्हाला वाईट वाटते, परंतु जेव्हा तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत असता तेव्हा तुम्हाला समजते की ते किती वेदनादायक आहे.

या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला

या घटनेत राहुल मिश्रा या 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर 38 वर्षीय रौनक मिश्रा जखमी झाले, त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रौनकला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

उदित नारायण यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, उदित नारायणने गेल्या वर्षी श्रीकांतच्या 'पापा कहते हैं (रिप्राइज)' आणि 2023 मध्ये 'गदर 2'च्या 'मैं निकला गड्डी लेके' आणि 'उड जा काले' यासारख्या त्याच्या जुन्या लोकप्रिय गाण्यांच्या नवीन आवृत्त्या रिलीझ केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT