Aparna Kanekar Died Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aparna Kanekar Died: 'साथ निभाना साथिया'फेम अभिनेत्रीचं निधन, मालिकेत 'जानकी बा'ची साकारली होती भूमिका

Priya More

Saath Nibhaana Saathiya Serial:

टेलिव्हिजन विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे. प्रेक्षकांची आवडती आणि लोकप्रिय मालिका 'साथ निभाना साथिया'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे निधन झाले आहे.

वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीसह साथ निभाना साथिया मालिकेतील संपूर्ण कास्टवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सेलिब्रिटींपासून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 'साथ निभाना साथिया'मध्ये जानकी बा मोदीची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अपर्णा काणेकर यांच्या आकस्मिक निधनाने टीव्ही स्टार्स आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अपर्णा काणेकर यांच्या निधनाची बातमी सहकलाकार लवली ससानने दिली. देवोलिना भट्टाचार्जी आणि तान्या शर्मा यांच्यासह 'साथ निभाना साथिया'च्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला असून अपर्णा यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. अपर्णा काणेकर या मालिकेच्या संपूर्ण टीमच्या खूप जवळ होत्या. सेटवर त्या सगळ्यांशी खूप प्रेमाने वागायच्या. तसंच मालिकेतील सर्वजणही त्यांच्यावर खूप प्रेम करायचे.

अभिनेत्री लवली ससाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपर्णा काणेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझं मन आज खूपच जड झाले आहे. कारण मला माहिती पडले की माझी खूपच आवडती व्यक्ती आणि एक खऱ्या योद्धाचे निधन झाले. मला भेटलेल्या सर्वात सुंदर आणि खंबीर व्यक्तींपैकी तू एक होती. सेटवर एकत्र वेळ घालवण्याची आणि चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी तुझी खूपच आभारी आहे. माझ्या प्रिय बा ला शांती मिळो. तुझी आठवण नेहमी येत राहिल, तुझा वारसा कायम राहील.' लवलीच्या या पोस्टवर कमेंट्स करत इतर सेलिब्रिटींनी अपर्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, अपर्णा काणेकर यांनी 'साथ निभाना साथिया' या मालिकेमध्ये २०११ मध्ये जानकी बा मोदी यांची भूमिका साकारली होती. या मालिकेत आधी ज्योत्स्ना कार्येकर यांनी ही भूमिका साकरली होती. पण त्यानंतर ज्योत्स्ना यांच्याऐवजी या भूमिकेसाठी अपर्णा यांची निवड करण्यात आली. त्यांनी ५ वर्षे ही भूमिका साकारली. या मालिकेमुळे त्या घराघरामध्ये पोहचल्या. सध्या अपर्णा यांच्या निधनाचे कारण समोर आले नाही. पण त्यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT