Urfi Javed Instagram @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: फॅशनवरुन उर्फीला हिंदुस्थानी भाऊची 'प्रसिद्धी साठी' धमकी, 'सुधर नाहीतर...'

उर्फीचे हटके कपडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. यावेळी तिच्या आउटफिटने बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊचे उर्फ विकास पाठकचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hindustani Bhau Comment On Urfi Javed: उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्स आणि विचित्र कपड्यांमुळे अनेकदा वादात सापडते. तिचे हटके कपडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. यावेळी तिच्या आउटफिटने बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊचे उर्फ विकास पाठकचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदुस्थानी भाऊने उर्फीला विचित्र कपडे घालण्यास मनाई केली असून ही भारताची संस्कृती नाही, उर्फीने असे कपडे घालू नये असा सल्ला यावेळी हिंदुस्थानी भाऊने दिला.

यामुळे समाजातील तरुणींमध्ये चुकीचा संदेश जातो. 'वेळीच सुधर. नाहीतर मी तुला सुधारेल.' असा उर्फीला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. उर्फीने हिंदुस्थानी भाऊंच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना उर्फी जावेदने हिंदुस्थानी भाऊंवर निशाणा साधत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्याने काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत ज्याद्वारे त्याने दावा केला आहे की हिंदुस्थानी भाऊ आपल्यासोबत काम करू इच्छित आहेत.

हिंदुस्थानी भाऊ या व्हिडिओत उर्फीला बोलतो, "जय हिंद. हा संदेश आहे उर्फी जावेदसाठी, जी आजकाल स्वत:ला मोठी फॅशन डिझायनर समजायला लागली आहे. फॅशनच्या नावाखाली तू जसे कपडे घालतेस, त्याने समाजावर वाईट प्रभाव पडत आहे.

ही भारताची संस्कृती नाहीये. तुझ्यामुळे लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत आहे वेळीच सुधर. नाहीतर मी तुला सुधारेन. भाऊ म्हणून सांगतोय आत्ताच सुधर" असे म्हणतो. या व्हिडीओद्वारे त्याने अप्रत्यक्षरित्या उर्फीला धमकी दिली आहे असे तिचे चाहते म्हणत आहेत.

Urfi
Urfi

उर्फीने या व्हिडिओला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी भाऊचा जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत हिंदुस्थानी भाऊ म्हणतो, 'कोणी काय घालावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे'. पुढील पोस्टमध्ये उर्फीने लिहिले की "३ महिन्यांपूर्वी या माणसाला माझ्या कपड्यांवर काहीच आक्षेप नव्हता. आता अचानक सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी तो माझ्या कपड्यांबाबत बोलत आहे. प्रसिद्धीसाठी हापापलेले असे लोक काहीही करु शकतात" असे उर्फीने लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

SCROLL FOR NEXT