Tunisha Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण! टुनिशा शर्माने आपल्या मागे सोडली 'इतक्या' कोटींची संपत्ती

अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यूला कवटाळणाऱ्या टुनिशाने अभिनयाच्या जोरावर करोडोंची संपत्ती गोळा केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tunisha Sharma Death: लोकप्रिय टिव्ही कलाकार टुनिशा शर्माच्या आत्महत्येने देशभरात खळबळ माजली आहे. चालू मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रेमप्रकरणातून अभिनेत्रीने ही आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टुनिशा शर्माने (Tunisha Sharma) आपल्या सहजसुंदर अभिनयाने मनोरंजन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी आत्महत्या करुन सर्वांना धक्का देणाऱ्या टुनिशाने याच अभिनयाच्या जोरावर करोडोंची संपत्ती गोळा केली होती. जाणून घेवूया तिच्या एकूण संपत्तीबद्दल.

अभिनेत्री टुनिशा शर्माने अवघ्या वयाच्या वर्षी जीवन संपवल्याने (Actress Death) तिच्या चाहत्यांसह अवघ्या सिने जगताला मोठा धक्का दिला आहे. टिनुशा शर्मा आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध होती. सध्या ती अलिबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत काम करत होती. याच मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने आत्महत्या करत जीवन संपवले.

अभिनेत्री टुनिशाचा जन्म चंदीगडमध्ये झाला. तिथेच अभिनेत्रीने आपले शालेय शिक्षण घेतले. पण अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. मुंबईत येवून अभिनेत्रीने सिने जगतात नाव तर कमावलेच, त्याचबरोबर करोडोंची संपत्तीही गोळा केली.

टुनिशाने इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून तिचा प्रवास सुरू केला. तिने भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या चित्रपटातून टीव्हीवर (Telivison Actress) पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत ती अनेक लोकप्रिय शोचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार, टुनिशा सुमारे 2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 15 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT