Tunisha Sharma Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma Case: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीझान खानच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्यास दिला नकार

Sheezan Khan Appeal Rejected By High Court: तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शीझानला अटक देखील झाली होती. ७० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला.

Priya More

Tunisha Sharma Suicide Case:

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) गेल्या वर्षी २०२२ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीनंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती. या प्रकरणी तुनिषाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड शीझान खान (sheezan khan) जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी तुनिषाच्या आईने शीझानविरोधात गुन्हा दाखल केला होता. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शीझानला अटक देखील झाली होती. ७० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. पण याप्रकरणी शीझानच्या अडचणी काही कमी झाल्या नाहीत.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझानने तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत हायकोर्टात धाव घेतली होती. त्याने हायकोर्टात याचिका दाखल करत तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. पण हायकोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे शीझानला मोठा झटका बसला आहे.

रिपोर्ट्सनुसार, शीझान खान आणि तुनिषा शर्मा रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. तुनिषाच्या आईने शीझानवर आपल्या मुलीची फसवणूक करणे, तिला हिजाब घालणे आणि उर्दू शिकण्यास भाग पाडल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधी तिचा शीझानसोबत ब्रेकअप झाला होता. शीझान खानने पोलिसांना सांगितले की, तुनिषासोबत त्याचे तीन महिने नातं होतं.

दरम्यान, शीझान खान 'खतरो के खिलाडी १३ मध्ये सहभागी झाला होता. या रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी शीझानने तुनिषासोबत 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री त्यानंतर प्रेम झालं. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट व्हायचे. सध्या तुनिषा आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगाव घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या अकोलेत मोर्चा

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

Amravati : धक्कादायक! सिनियरचा त्रास असाह्य झाला, फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT