Surbhi Jyoti Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Surbhi Jyoti Wedding : टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योतीनं निसर्गाच्या सानिध्यात घेतले सात फेरे, पाहा PHOTO

Surbhi-Sumit : टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहा.

Shreya Maskar

'नागिन' फेम सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) नुकतीच लग्नबंधनात (Wedding ) अडकली आहे. तिने आपला बॉयफ्रेंड सुमित सूरीसोबत (Sumit Suri ) निसर्गाच्या सानिध्यात लग्नगाठ बांधली आहे. 27 ऑक्टोबरला सुरभीचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सुरभीने आपल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. सुरभीने लग्नासाठी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यावर मॅचिंग ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला. तर दुसरीकडे सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. दोघही फोटोमध्ये खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. सुरभीने "शुभ विवाह 27/10/2024" असे कॅप्शन दिले आहेत. त्यांच्या या फोटोंवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

सुरभी आणि सुमितने डेस्टिनेशन वेडिंग केले. त्यांनी उत्तराखंडातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची यासाठी निवड केली. सुरभी ज्योतीने जिम कॉर्बेट प्राणी संग्रहालयातील आहना रिसॉर्टमध्ये सुमित सूरीसोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नसोहळ्याला तिचे कुटुंब आणि जवळचे मित्र होते. हा इकोफ्रेंडली विवाहसोहळा शानदार पद्धतीने पार पडला.

सुरभीने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या हळदीचे फोटोही शेअर केले आहेत. दोघही फोटोमध्ये खूप छान दिसत आहेत. हळदीसाठी सुरभीने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता तर सुमितने ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता घातला होता. मिनिमल मेकअपमध्ये सुरभी खूप सुंदर दिसत होती. तिने आपल्या मित्रांनसोबत हळदी समारंभ खूप एन्जॉय केला आहे. येलो लव्ह अफेअर' असे हटके कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Maharashtra Live News Update : मला मंत्रीपद मिळतं म्हणून विरोधकांच मन जळतं - रामदास आठवले

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

SCROLL FOR NEXT