Nia Sharm Buys New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Nia Sharma Buys New Car: टीव्ही अभिनेत्री निया शर्माने धनत्रयोदशीनिमित्त एक नवीन कार खरेदी केली आहे. तिच्या कारची पूजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Nia Sharm Buys New Car: "नागीन" फेम अभिनेत्री निया शर्माने नुकतीच एक चमकदार नवीन पिवळ्या रंगाची मर्सिडीज कार खरेदी केली. तिने हा प्रसंग साजरा करतानाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या घरी नवीन कारचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जाणून घेऊया या कारची किंमत.

नवीन कारचे नारळ फोडून स्वागत

निया शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या नवीन कारसमोर नारळ फिरवताना आणि तो फोडताना दिसत आहे. ती खूप आनंदी दिसत आहे. तिचे चाहते तिच्या नव्या कारसाठी शुभेच्छा देत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो

निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कारच्या उद्घाटनाचे फोटो शेअर केले. तिने एक विनोदी कॅप्शन लिहिले, "ओएमजी, सर्व पैसे संपले आहेत, ईएमआय चालू झाला. नविन अनुभव आणि बालपणीच्या आठवणींसाठी धन्यवाद."

निया शर्माने कोणती कार खरेदी केली?

अभिनेत्रीने अलीकडेच पिवळी मर्सिडीज-एएमजी सीएलई ५३ खरेदी केली. या कारची किंमत 1.28 करोड़ आहे. ही तिची पहिली कार नसून २०२१ मध्ये, तिने एक काळ्या रंगाची व्होल्वो XC90 SUV खरेदी केली आणि तिच्या गॅरेजमध्ये ऑडी Q7 आणि ऑडी A4 देखील आहे.अभिनेत्री निया शर्माने एकता कपूरच्या "नागिन" मध्ये निगेटिव्ह भूमिका साकारली, यामुळे तिला बरीच ओळख मिळाली. तसेच तिने लाफ्टरशेफमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मन जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT