Ronit Roy Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ronit Roy Wedding: ५८ वर्षांचा बॉलिवूड अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर, गोव्यातील मंदिरामध्ये केलं लग्न; VIDEO व्हायरल

Ronit Roy And Neelam Singh Wedding: रोनित आणि नीलम या दोघांनीही पारंपारिक पद्धतीने गोव्यातील एका मंदिरामध्ये लग्न (Ronit Roy Wedding) केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Priya More

Ronit Roy Wedding Video:

हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये 'मिस्टर बजाज' आणि 'मिहीर' या नावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) सध्या चर्चेत आला आहे. रोनित रॉय वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. रोनित रॉयने त्याच्या लग्नाच्या २० व्या वाढदिवशी पत्नी नीलम सिंहसोबत पुन्हा लग्न केलं. दोघांनीही पारंपारिक पद्धतीने गोव्यातील एका मंदिरामध्ये लग्न (Ronit Roy Wedding) केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

रोनित रॉय आणि नीलम सिंह यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही हे दोन्ही सेलिब्रिटी एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. लग्नाच्या २० व्या वाढदिवसाचा दिवस आणखी खास बनवण्यासाठी या दोघांनीही पुन्हा लग्न केले. रोनित रॉय आणि नीलम सिंहच्या दुसऱ्या लग्नाला कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त काही जवळचे मित्र उपस्थित होते.

अभिनेत्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रोनितने लग्नाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'दुसऱ्या वेळा काय, हजारो वेळा तु्झ्याशीच लग्न करेल. २० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह.' दुसऱ्या लग्नात रोनित रॉयने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि गळ्यात लाल रगंचा स्कार्फ घेतला होता. तर नीलमने लाल रंगाचा पलाझो आणि कुर्ता परिधान केला होता. रोनित रॉयच्या दुसऱ्या लग्नाच्या व्हिडओ आणि फोटोंना त्याचे चाहते चांगली पसंती देत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. रोनित आणि नीलमच्या लग्नाला त्यांचा १६ वर्षांचा मुलगा अगस्त्यही उपस्थित होता.

तसं पाहायला गेलं तर रोनित रॉय यांचे हे तिसरं लग्न आहे. रोनित रॉयचे पहिले लग्न झाले होते. रोनितने जोहाना मुमताज खानशी लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फक्त ६ महिनेच टिकले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर रोनितने नीलम सिंहसोबत दुसरं लग्न केले. रोनित आणि नीलमच्या लग्नाला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच खास क्षणानिमित्त त्याने नीलमसोबत पुन्हा लग्न केले. अशापद्धतीने रोनितने त्याच्या आयु्ष्यात तीन लग्न केली आहेत.

दरम्यान, रोनित रॉयने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये रोनितने मिहीरची व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळे त्याला खूपच चांगली पसंती मिळाली होती. तर 'कसौटी जिंदगी के'मध्ये रोनितने मिस्टर बजाजची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने 'जान तेरे नाम', 'कहने को हमसफर', 'काबिल' आणि 'बॉस' यामध्ये देखील काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT