Akshaya Deodhar And Hardeek Joshi First Mangalagaur Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaya- Hardik Mangalagaur Video: अक्षया- हार्दिकची लग्नानंतरची पहिली मंगळागौर, ‘पिंगा गं पोरी पिंगा...’ खेळतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Akshaya- Hardik Mangalagaur Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर हार्दिक-अक्षयचा मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Akshaya Deodhar And Hardeek Joshi First Mangalagaur Video Viral

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर सध्या तुफान चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ही जोडी त्यांच्या लग्नामुळे तर सध्या मंगळागौर या खेळामुळे सध्या ही जोडी चर्चेत आली आहे. श्रावण महिना म्हटलं की आपसुकच मंगळागौर खेळाची चर्चा सुरू होते. गेल्या वर्षी २ डिसेंबरला हार्दिक- अक्षय या कपलने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतरची पहिली मंगळागौर नुकतीच हार्दिक- अक्षय यांनी साजरी केली आहे. सध्या सोशल मीडियावर हार्दिक-अक्षयचा मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रिल लाईफमध्ये एकमेकांचे असलेले जोडीदार रियल लाईफमध्येही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. दोघांनीही याआधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. त्या मालिकेमध्ये ‘बरकद’ चे पात्र साकारलेल्या अमोल नाईकने नुकताच सोशल मीडियावर अक्षय- हार्दिक मंगळागौर खेळत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मंगळगौर खेळाची तुफान चर्चा होत आहे. अमोल नाईकने शेअर केलेल्या व्हिडीओ अक्षया- हार्दिक दोघंही मोठ्या आनंदाने मंगळागौर खेळताना दिसत आहे. “पिंगा गं पोरी पिंगा…” या गाण्यावर हार्दिक- अक्षयासोबत अनेक महिलाही मंगळागौर खेळताना दिसत आहे.

अमोलने हार्दिक- अक्षयाचा मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “अहा (अक्षया- हार्दिक)ची… मंगळागौर, दोघे कायम असेच राहा. बाकी,”स्वामी” आहेतच कायम पाठीशी…श्री स्वामी समर्थ” अशा आशयाचे कॅप्शन दिले. मंगळागौर कार्यक्रमात हार्दिकने आणि अक्षयाने मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातलेला दिसत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

हार्दिक- अक्षया ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये एकमेकांचे जोडीदार दाखवले होते. रिल लाईफप्रमाणेच रियल लाईफमध्येही एकमेकांचे जोडीदार आहेत. हार्दिक- अक्षयाने गेल्या वर्षी पुण्यामध्ये २ डिसेंबर रोजी पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.

दोघांच्याही वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच हार्दिक जोशी, महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच हार्दिक सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये अभिनय करतोय. तर अक्षयाबद्दल बोलायचे तर, ती सध्या कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेमध्ये नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT