Tunisha Sharma Instagram @_tunisha.sharma_
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma: हत्या की आत्महत्या?: टुनिशा शर्माचा मृत्यूचे नेमकं कारण काय?

टुनिशाचा मृतदेह शीजान खानच्या मेकअप रूममध्ये आढळला.

Pooja Dange

Tunisha Sharma Death: टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने काल मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. टुनिशाचा मृतदेह काल तिचा सहकलाकार शीजान खानच्या मेकअप रूममध्ये आढळला. तिने आत्महत्या केली असली तरी तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे की तिचा खून झाला आहे. टुनिशाच्या घरच्यांनी शीजान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

टुनिशा शर्माचा मृतदेह शीजान खानच्या मेकअप रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस येण्यापूर्वीच सेटवर उपस्थित लोकांनी तिचा मृतदेह खाली उतरवला होता. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, टुनिशा नॉर्मल होती. मृत्यूच्या काही तास आधी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. तुनिषाच्या कथित आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Social Media)

टुनिशाच्या पोस्टमोर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर तिच्या आत्महत्याचे कारण समोर येईल. सध्या पोलिस तिची हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टुनिशा शीजानच्या मेकअप रूममधील वॉशरूम वापरण्यासाठी गेली होती. खूप वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून दरवाजा तोडून पाहिले तेव्हा तिने स्वतःला गळफास लावून संपवले होते. (Actress)

पोलिस सेट उपस्थित लोक, कुटुंबीय आणि तिच्या जवळ असणाऱ्या सर्वांची चौकशी करत आहेत. त्या चौकशीच्या आधारावर पोलिसांनी शीजान खान याला अटक केली आहे. शीजानला आज कोर्टात नेण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यांच्यावर आयपीएस कलम ३०६ नुसार आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabaleshwar Tourism: फ्रेंड्ससोबत धमाल करायचीये? महाबळेश्वरजवळची ही ‘Hidden’ ठिकाणं ठरतील परफेक्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण अडकले

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानविषयी या गोष्टी माहित आहेत का?

Shocking: कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बेळगावमधील भयंकर घटना

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT