Marathi Actress Kalyani Kurale Jadhav
Marathi Actress Kalyani Kurale Jadhav Saam TV
मनोरंजन बातम्या

Tujhyat Jeev Rangala : अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचं कोल्हापूरात अपघाती निधन; आठवड्याभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

साम वृत्तसंथा

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Tujhyat Jeev Rangala: मराठी सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी आहे. लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झालेला आहे.

तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेसह अनेक नामवंत मालिकेत तिने काम केले होते. काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने तिने (Marathi Actress) हाॅटेल सुरू केले होते. हाॅटेल बंद करुन बाहेर पडताना एका भरधाव डंपरने कल्याणीला धडक दिली ज्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Kalyani Kurale Jadhav Passed Away)

आठवड्याभरापूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

कल्याणीने आठवड्याभरापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यात ती भाकऱ्या थापताना दिसतेय.

तिने या व्हिडिओच्या कॅप्सशनमध्ये म्हटलं की, माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला... मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या... ही तिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तीन हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या अपघाती निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेबद्दल

तुझ्यात जीव रंगला ही एक भारतीय रोमँटिक टिव्ही मालिका आहे जिची निर्मिती सोबो फिल्म्सने केली आहे. झी मराठी वाहिनी आणि झी फाईव्ह डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेचे मनोरंजनाच्या अधिकमासात आणि एक किंवा दोन तासांचे विशेष भाग रविवारी प्रक्षेपण केले जात होते. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.७, ८.५ असे सर्वोच्च स्तर गाठले आहेत.

कलाकार [Tujhyat Jeev Rangala Cast]

हार्दिक जोशी = रणविजय प्रतापराव गायकवाड (राणादा, राजा राजगोंडा)

रुद्र रेवणकर = लहान रणविजय

अक्षया देवधर = अंजली रणविजय गायकवाड / अंजली दिनकर पाठक (पाठकबाई, जिजा)

धनश्री काडगांवकर / माधुरी पवार = नंदिता सूरज गायकवाड / नंदिता उत्तमराव जाधव (ताईसाहेब)

राज हंचनाळे = सूरज प्रतापराव गायकवाड (सन्नीदा)

सिद्धेश खुपरकर = लहान सूरज

छाया सांगावकर = गोदावरी (गोदाक्का)

मिलिंद दास्ताणे = प्रतापराव गायकवाड (आबा)

अमोल नाईक = बरकत

दीप्ती सोनावणे = चंदा

श्रुती कुलकर्णी = रेणुका (रेणू)

प्रफुल्ल (पप्पू) गवस = महाजन मास्तर

वाग्मी शेवाडे = राजलक्ष्मी रणविजय गायकवाड (लक्ष्मी)

श्रेयस मोहिते = युवराज सूरज गायकवाड

राजवीरसिंह राजे = लाडू

शिवराज वाळवेकर / बाळकृष्ण शिंदे = संग्राम मोहिते

अवधूत जोशी = सरपंच अवधूत

अभिषेक कुलकर्णी = परेश पाटील

योगेशकुमार पवार = बंड्या

संजीवकुमार पाटील = निवृत्ती नाईक

संध्या माणिक = माधुरी जावळे / माधुरी सूरज गायकवाड

नेहा बाम = नंदिताची आई

श्रीराम कोल्हटकर = बलसारा सर

विकास पाटील = आदित्य गोरे

रुचा आपटे = सखी

अतुल पाटील = भाल्या

श्वेता कुलकर्णी = भाल्याची बायको

अतुल सनस = जयंत

प्राची गोडबोले = अंजलीची आई

कल्याणी जाधव = राधा

उमेश बोळके = रेणुकाचे बाबा

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT