Prajakta Chavan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tuja Maja Sapan Serial: उधळलेल्या बैलाला प्राजक्ताने मोठ्या शिताफीने आणलं काबूत, VIDEO होतोय व्हायरल

Prajakta Chavan Video: ही मालिका नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मालिकेच्या सेटवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अशामध्ये प्राजक्ताचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Priya More

Tuja Maja Sapan:

सोनी मराठीवरील मालिका ‘तुजं माज सपान’ (Tuja Maja Sapan Serial) या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेतील कुस्तीपटू प्राजक्ता आणि विरू यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत आहे. महत्वाचे म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता आणि विरू घराघरामध्ये पोहचले. अल्पावधितच या दोघांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं. ही मालिका नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मालिकेच्या सेटवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अशामध्ये प्राजक्ताचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिचे कौतुक केले आहे.

प्राजक्ता उधळलेल्या बैलाला मोठ्या शिताफीने काबूत आणते. या बैलाच्या मागे पळू ती त्याला पकडते आणि शांत करते. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी 'तुजं माजं सपान' या मालिकेच्या सेटवरील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी प्राजक्ताच्या या धाडसाचे खूपच कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

सचिन गोस्वामी यांनी प्राजक्ताचा हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात की, 'तुजं माजं सपान' या सोनी मराठीवरील मालिकेतील नायिका पैलवान प्राजक्ता ही मुळातच एक कुस्तीपटू आहे. साताऱ्यातील एका गावात, शेतकरी कुटुंबात वाढलेली प्राजक्ता आता एक यशस्वी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. आमच्या वेटक्लाउड प्रॉडक्शन्सच्या या 'तुजं माजं सपान' या सोनी मराठीवरील दैनंदिन मालिकेत नुकतच एक साहस दृश्य चित्रित झालं. यात एका उधळलेल्या बैलाला प्राजक्ता शिताफीने काबूत आणते आणि शाळकरी मुलांचा जीव वाचवते.'

या पोस्टमध्ये ते पुढे लिहितात की, 'या चित्रीकरणाच्या निमित्ताने प्राजक्ताच्या धडाडीचे कौतुक वाटले. अनोळखी प्राण्यासोबत चित्रीकरण हे अत्यंत जिकिरीचे काम. त्यात उधळलेला बैल सावरणे. त्यासाठी अनेकदा प्रत्येक शॉटसाठी त्या बैलासोबत अभिनय करायचा हे सगळं कठीण काम प्राजक्ताने अगदी सहजतेने केलं. यामागे तिचं गावात, शेतात, विविध प्राण्यांच्या सोबत घालवलेल्या काळाचा अनुभव कमी आला. प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री तर आहेच पण कुस्तीपटू आणि शेती कन्या आहे. प्राजक्ताच्या या धाडसाचे कौतुक आणि तिच्या मातीशी घट्ट असलेल्या नात्याचा आदर वाटतो. प्राजक्ता तुला खूप शुभेच्छा.'

दरम्यान, ‘तुजं माज सपान’ ही मालिका १९ जून २०२३ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्राजक्ता अर्थात अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ही मूळची साताऱ्याची असून ती कुस्तीपटू आहे. तर वीरुच्या भूमिकेत असलेला अभिनेता संकेत चिकटगावकर हा मुळचा औरंगाबादजवळच्या वैजापूरचा आहे. या चित्रपटाची निर्मिती सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मती संस्थेने केली आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच शूटिंग नाशिकमध्ये सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT