Saif Ali Khan's Ravan VFX Meme: ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर सध्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटावर जितका कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्याहून अधिक चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटातील एक पात्र कमालीचे ट्रोल होत आहे, ते म्हणजे रावण... रावणाची भूमिका चित्रपटात सैफ अली खानने साकारले आहे. आणि बरं चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यासाठी सैफने निर्मात्यांकडून चांगलेच घसघशीत मानधन घेतले. सध्या रावणाच्या लूकवरून सैफला नेटकरी तुफान ट्रोल करीत आहे.
सध्या सोशल मीडियावर रावणाचे अनेक लूक तुफान व्हायरल होत आहे. लांब केस, डोळ्यात काजळ, दहा डोके असलेला सैफचा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रावणाच्या लूकमध्ये सैफला पाहून नेटकऱ्यांनी त्यांची बरीच खिल्ली उडवली आहे. अनेकांनी रावणाच्या लूकची तुलना थेट मुघलांशीच केली आहे. तर काहींनी रावणाची तुलना कार्टूनसोबतच केली आहे. सध्या आदिपुरूष चित्रपट ट्वीटरवर तुफान ट्रोल होत आहे.
एका युजरने सोशल मीडियावर रामयणातील आणि आदिपुरूषमधील रावणाचा लूक टाकून फोटो शेअर केला आहे, युजर म्हणतो, “रावणाचा लूक निराशाजनक आहे.” तर आणखी एक म्हणतो, “हे प्रभू हे बनवणाऱ्या व्यक्तीच्या पोटात बाण मारा!” असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले.
सोबतच रावणाचा दहा तोंड असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून नेटकरी म्हणतात, “ओम राऊत, तुम्ही काय केले? सैफ अली खानला रावणाच्या लूकमध्ये अक्षरश: जोकर बनवलं आहे.”
तर एकाने चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याला सैफचा लूक फारच भावला आहे. “सैफने चित्रपटात उत्तम अभिनय केला,” असल्याची कमेंट एका चाहत्याने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.