Top 10 Web Series List SAAM TV
मनोरंजन बातम्या

Top 10 Web Series List : घरबसल्या कोणी जिंकले प्रेक्षकांचे मन? २०२४ मधील टॉप १० वेब सीरिजची यादी पाहाच

Top 10 Hindi Web Series 2024: यंदा वेब सीरिजने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे. 2024 मध्ये कोणत्या वेब सिरीज प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस आल्या, जाणून घ्या.

Shreya Maskar

यंदा घरबसल्या देखील प्रेक्षकांचे कलाकारांनी भरपूर मनोरंजन केले आहे. अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले. तर अनेक वेब सीरिजनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. एशियानेट न्यूजच्या रिपोर्टनुसार, 2024 मधील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या हिंदी वेब सीरिजची (Top 10 Hindi Web Series) यादी जाणून घ्या.

टॉप 10 वेब सीरिज

मिर्झापूर सीझन 3

'मिर्झापूर' वेब सीरिजचा सीझन 3 प्राइम व्हिडीओवर पाहता येतो . या सीरिजमधील मुन्ना भैय्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. ही सीरिज आजही खूप गाजत आहे.

पंचायत सीझन 3

2024 मध्ये 'पंचायत' चा सीझन 3 पाहायला मिळाला. पंचायत वेब सीरिज प्राइम व्हिडिओवर पाहता येते. या सिरिजमध्ये जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता हे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळाले.

हीरामंडी

हीरामंडी: डायमंड बाजार ही वेब सीरिज 2024 मध्ये खूप गाजली. हा ड्रामा नेटफ्लिक्सवर आपल्याला पाहायला मिळाला. यात संजय लीला भन्साळी यांनी तगडी स्टारकास्ट ठेवली होती. यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सेगल आणि संजीदा शेख यांचा समावेश होता.

इंडियन पोलीस फोर्स

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील 'इंडियन पोलीस फोर्स' वेब सीरिज होय. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी पाहायला मिळाले. 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

'द लीजेंड ऑफ हनुमान'

'द लीजेंड ऑफ हनुमान' याचे सीझन 3 आणि 4 या वर्षात पाहायला मिळाले. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळते. ही सीरिज भगवान हनुमानावर आधारित आहे. जबरदस्त ॲक्शन यात तुम्हाला पाहायला मिळते.

किलर सूप

किलर सूप या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. अभिनेता मनोज बाजपेयी यांची या सीरिजमध्ये दुहेरी भूमिका पाहायला मिळते.

कोटा फॅक्टरी सीझन 3

2024 मध्ये 'कोटा फॅक्टरी' सीझन 3 पाहायला मिळाला. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. एका विद्यार्थ्याचा प्रवास यातून सांगितला आहे.

गुलक सीझन 4

'गुलक' सीझन 4 ही वेब सीरिज सोनी लिव्हवर पाहता येते. या सीरिजमध्ये कॉमेडी आणि भावनिक दोन्ही बाजू दाखवण्यात आल्या आहेत.

शोटाइम

डिस्ने प्लस हॉटस्टारवर शोटाइम ही सीरिज पाहता येते. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय आणि राजीव खंडेलवाल हे मोठे कलाकार पाहायला मिळाले.

महाराणी सीझन 3

'महाराणी' सीझन 3 सोनी लिव्हवर पाहता येते. या सीरिजचे कथानक राजकीय आहे. ही सीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT