Lal Salaam Released In Hindi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lal Salaam Released In Hindi : रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हिंदीमध्ये पाहायला मिळणार, कधी आणि कुठे होणार रिलीज?

Chetan Bodke

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचे चित्रपट चाहत्यांसाठी खास पर्वणीच असते. गेल्या काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर 'लाल सलाम' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट तेलुगू भाषेत रिलीज झाला होता. आता हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. येत्या २४ मे २०२४ ला हिंदी भाषेत चित्रपट रिलीज होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे.

तामिळ भाषेत हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ ला रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३६ कोटींची कमाई केलेली होती. चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी एका गँग लीडरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा मोईद्दीन भाईच्या जीवनासंबंधीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. हार्ड हिटिंग स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रजनीकांत आहेत.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत विष्णू विशाल, विक्रांत, विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थंबी रमैय्या यांचीही भूमिका आहे. यासोबतच क्रिकेटर कपिल देव सुद्धा दिसणार आहेत. टॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट आपलं अनोखं स्थान निर्माण करेल, हे नक्की. रजनीकांत यांच्या 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. तमिळ 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर भव्य यश मिळवत प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली आहे. आशयघन कथानक आणि रजनीकांत यांचा जबरदस्त अभिनयाच्या बळावर 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश मिळवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्रीक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

SCROLL FOR NEXT