Vijay Thalapathy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Thalapathy: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला थलापती विजय, स्वत:च्या हाताने वाटलं अन्नधान्य; VIDEO व्हायरल

Vijay Thalapathy Helped Flood Victim: अभिनेता थलापती विजय हा आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच समाजकार्यामध्ये देखील खूप सक्रिय असतो. तो नेहमी गरजूंना मदतीसाठी हात पुढे करत असतो. अशामध्ये आता तामिळनाडूतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता रस्त्यावर उतरला आहे.

Priya More

Vijay Thalapathy Video:

तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) थुथुकुडी (तुतीकोरीन) आणि तिरुनेलवेली जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पूरामुळे या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहेत. याठिकाणच्या नागरिकांना राहायला जागा नाही आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशामध्ये या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्वस्तरावरून मदतीचे हात पुढे येत आहेत. अशामध्ये साऊथचा सुपरस्टार थलापती विजय (Vijay Thalapathy) या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

अभिनेता थलापती विजय हा आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच समाजकार्यामध्ये देखील खूप सक्रिय असतो. तो नेहमी गरजूंना मदतीसाठी हात पुढे करत असतो. अशामध्ये आता तामिळनाडूतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता रस्त्यावर उतरला आहे. अभिनेत्याने पूरग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून अन्नधान्याचे वाटप केले. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी अभिनेत्याने संवाद साधला. अभिनेत्याने केलेली मदत पाहून अनेक नागरिक भावुक झाले. त्यांनी अभिनेत्याचे आभार मानले.

'लिओ' फेम अभिनेता थलापती विजय ३० डिसेंबरला तुतिकोरिन विमानतळावर पोहोचला. त्यानंतर अभिनेत्याने पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांना मदत केली. त्याने या भागातील प्रत्येक सदस्याला घरउपयोगी साहित्य, अन्नधानाच्याचे वाटप केले. त्याचा साधेपणा पाहून सगळेच थक्क झाले. यावेळी अभिनेत्यासोबत अनेकांनी फोटो काढण्याचा देखील आनंद घेतला. अभिनेत्याच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, थलापती विजय 28 डिसेंबर रोजी अभिनेता विजयकांत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहचला होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याच्याभोवती मोठी गर्दी केली होती. अशामध्ये कोणी तरी त्याच्यावर हल्ला देखील केला. विजयच्या अंगावर कोणीतरी चप्पल फेकून मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नेटिझन्स आणि त्याच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT