९ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज झाले आहेत. थलैवा रजनीकांत यांचा 'लाल सलाम', रवी तेजा स्टारर 'ईगल' आणि शाहिद- क्रितीचा 'तेरी बातों मैं उल्झा जिया' अशे तीन चित्रपट एकत्रित थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. असं असलं तरीही प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
थलैवा रजनीकांतचा चित्रपट रिलिज होणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये उत्साह संचारलेला असतो. पण या चित्रपटादरम्यान असं काहीच दिसत नाही. दोन्ही टॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली नाही. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल (Tollywood)
थलैवा रजनीकांत यांचा दक्षिण भारतात दबदबा फार मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा चित्रपट रिलीज होणार, म्हटल्यावर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी थिएटर्सच्या बाहेर चाहत्यांची एकच गर्दी होते. पण 'लाल सलाम' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये इतकी फारशी क्रेझ दिसून येत नाही.
चित्रपटाने अवघ्या पहिल्या दिवशी जेमतेम ४ कोटींच्या आसापसची कमाई केली आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट असेल ज्याने पहिल्या दिवशी इतकी कमी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, दक्षिणेकडील राज्यांमध्ये थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फार कमी असल्यामुळे शोच रद्द करण्यात आला. (Bollywood Film)
चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी एका गँग लीडरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा मोईद्दीन भाईच्या जीवनासंबंधीत आहे. हार्ड हिटिंग स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रजनीकांत यांच्यासोबत क्रिकेटर कपिल देवसुद्धा आहेत. या व्यतिरिक्त, विष्णू विशाल, विक्रांत, विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि थंबी रमैय्या यांचीही भूमिका आहे. ॲक्शन आणि स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. (Bollywood Actor)
दरम्यान, रवी तेजा स्टारर 'ईगल' चित्रपटाविषयी सांगायचे तर, चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.५ कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. 'ईगल' चित्रपट थिएटरमध्ये तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.