Hanuman 6th Day Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hanuman 6th Day Collection: बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’चा बोलबाला; सहाव्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Hanuman Box Office Collection: अवघ्या २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या तेजा सज्जा स्टारर ‘हनुमान’ चित्रपटाने भारतात आतापर्यंत ८१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Chetan Bodke

Hanuman 6th Day Box Office Collection

सध्या तेजा सज्जा स्टारर ‘हनुमान’ चित्रपटाची  बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. अवघ्या २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ८१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. (Tollywood)

चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांकडे पाहिलं तर तेलुगू आणि हिंदी भाषेला प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील व्हिएफएक्सचंही सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी १६ कोटी, चौथ्या दिवशी १५. २ कोटी, पाचव्या दिवशी १३. ११ कोटी तर सहाव्या दिवशी ११.६९ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचं व्हिएफएक्स, कथानक आणि कलाकारांचा अभिनय याचे जोरदार कौतुक होत आहे. (Bollywood Film)

तेजा सज्जाच्या या चित्रपटाने सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ : चाप्टर 1’ आणि ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’लाही मागे टाकत स्वत:च्या नावावर नवा विक्रम केला आहे. केजीएफने प्रदर्शनाच्या पहिल्या सोमवारी 10.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कांतारा’ने 3.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. सोमवारी ‘हनुमान’ चित्रपटाने 14.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची सोशल मीडियावर जरीही जोरदार चर्चा सुरु असली तरीही चित्रपटाने अद्याप तरी १०० कोटींचा टप्पा गाठलेला नाही. दुसऱ्या विंकेंडला हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. (Bollywood News)

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' चित्रपट १२ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट अवघ्या २० कोटींमध्ये निर्मित झाला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तेजा सज्जा सह अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेन्नेला किशोर अशी स्टारकास्ट आहे. तर चित्रपटाची निर्मिती एस. निरंजन रेड्डी आणि के निरंजन रेड्डी आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT