NAGA CHAITANYA goggle
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya: लक्झरी लाइफस्टाईल, महागड्या कार अन् आलिशान घर; दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यची संपत्ती किती?

Naga Chaitanya Net Worth: तेलगू चित्रपटांमध्ये नागा चैतन्य एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नागा चैतन्यच्या दमदार अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण नागा चैतन्य किती कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे, हे जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दक्षिणात्य भारतीय चित्रपटातील नागा चैतन्य एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नागा चैतन्यने अनेक चित्रपटांमध्ये काम करुन सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नागा चैतन्यच्या दमदार अभिनयाने आणि हटके स्टाईलने सर्वांना आपले वेड लावले आहे. नागा चैतन्यचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. सध्या नागा चैतन्यने तेलगू इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तेलगू चित्रपटांमध्ये नागा चैतन्य एक श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. सध्या नागा चैतन्य सोशल मिडियावर देखील खूप चर्चेत आहे. पण तेलगू स्टार असणारा नागा चैतन्य किती कोटी संपत्तीचा मालक आहे, असा प्रश्न सर्व चाहत्यांच्या मनात आहे. म्हणून आज जाणून घेऊया नागा चैतन्यची एकूण संपत्ती.

अभिनेता नागा एका चित्रपटासाठी ५ ते १० कोटी रुपये घेतो. नागा चैतन्यचे बंगारराजू, थँक यू, लाल सिंग चड्डा यांसारखे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. नागा चैतन्यची रिअल इस्टेट, व्यवसाय यांसारख्या गोष्टीमध्ये देखील गुंतवणूक आहे. नागा चैतन्यने २०२२ मध्ये हैदराबादमधील दक्षिणपूर्व आशियाई खाद्यपदार्थ असणारे शोयु हे क्लाउड किचन लाँच केले आहे. या क्लाउड किचनमधून नागा चैतन्य पैसे कमवत असतो. अभिनेता नागाची Myntra, Ariel,Tasva,Magnum India,Dasos Cabinetes यांसारख्या ब्रँडमध्ये एंडोर्समेंट आहे. नागा चैतन्यची हैदराबादमधील अपस्केल जूबली हिल्समध्ये १५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

नागा चैतन्याला लक्झरी वस्तू आणि महागड्या कारची प्रचंड आवड आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे महागड्या कारचे अप्रतिम कलेक्शन देखील आहे. नागाकडे पोर्श 911 आहे, ज्याची किंमत सुमारे ३.५१ कोटी रुपये आहे. नागा चैतन्यकडे बीएम डब्लयू 7 सिरीज, रेंज रोव्हर गोस्ट, फेरारी F430,मर्सिडीज बेंझ G क्लास G63 यांसारख्या मॅाडेलच्या महागड्या कार आहेत. नागा चैतन्यच्या फेरारी F430 ची किंमत सुमारे १.७५ कोटी रुपये आहे, तर G क्लास G63 कारची किंमत १ कोटी रुपये आहे. अभिनेता चैतन्यकडे बाइकचे देखील अप्रतिम कलेक्शन आहे. त्याच्याकडे MV Augusta F4 आहे, ज्याची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर नागाकडे BMW R9T आहे, ज्याची किंत सुमारे १९.३ लाख रुपये आहे. प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य १५४ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT