Shruti Haasan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shruti Haasan: मला दारू प्यायची सवयी लागली होती पण..., श्रृती हासनने सांगितला ८ वर्षांच्या स्ट्रगलचा तो किस्सा

Shruti Haasan Saalar Movie: अभिनेत्री श्रृती हासन (Shruti Haasan) सध्या चर्चेत आली आहे. श्रृती लवकरच तिचा आगामी चित्रपट 'सालार'च्या (Salaar Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Shruti Haasan Alcohol Addiction:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून (South Film Industry) ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रृती हासन (Shruti Haasan) सध्या चर्चेत आली आहे. श्रृती लवकरच तिचा आगामी चित्रपट 'सालार'च्या (Salaar Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटामध्ये श्रृती 'बाहुबली' फेम प्रभाससोबत (Superstar) Prabhas) काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये श्रृती हासन खूपच व्यस्त आहे. अशामध्ये श्रृतीने तिला लागलेली दारूची सवयी आणि ती सोडण्यासाठी तिने केलेला ८ वर्षांचा स्ट्रगल सांगितला आहे.

श्रृती हासनने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'मी कधीही ड्रग्सचे सेवन केले नाही. पण मला दारूचे व्यसन लागले होते. दारू माझ्या आयुष्यातला मोठा भाग झाली होती. पण आता आठ वर्षांपासून मी स्वत:वर नियंत्रण ठेवत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही दारू पित नसाल तेव्हा पार्ट्यांमध्ये लोकांना सहन करणे कठीण असते. मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला आता हँगओव्हर नाही आणि माझ्यासाठी शांत राहणे चांगले आहे. हे एक पाऊल असू शकते. किंवा असेही होऊ शकते तुम्हाला हे आयुष्यभर करायला आवडेल. हे चांगले आहे.'

श्रुतीने पुढे सांगितले की,'मी कधीच ड्रग्स घेतले नाही. पण नेहमी मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत दारू प्यायची. मी कधीच ड्रग्सच्या आहारी नाही. पण दारू ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट होती. आज जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा असे वाटते की ते माझ्यासाठी अजिबात चांगले नव्हते. मला नेहमीच इच्छा झाली की माझ्या मित्रांसोबत दारू प्यावीशी वाटायची. कारण तेव्हा मला असे वाटायचे की हे माझ्या नियंत्रणात आल्यासारखे आहे.'

दरम्यान, अभिनेता आदिवी शेषने शनिवारी आगामी अॅक्शन ड्रामामधील 'लीडिंग लेडी' या व्यक्तिरेखेचे ​​पोस्टर रिलीज केले. लेटेस्ट पोस्टरमध्ये श्रुतीचा आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती राग व्यक्त करताना दिसत आहे आणि तिच्या तीव्र भावना दिसत आहेत. आदिवी शेषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या सह-कलाकाराचा लूक शेअर केला आणि लिहिले, 'श्रुती हसनसोबत काम करताना खूप अभिमान आणि उत्साही आहे. सुंदर हृदय... सुंदर आत्मा... काही जादुई आणि गोंधळलेली केमिस्ट्री वाट पाहत आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लूक 18 डिसेंबरला प्रदर्शित होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT