Actress Dimple Hayathi and her husband Accused of Harassment and Assault by house helper maid  Saam Tv
मनोरंजन बातम्या

FIR Against Actress: मोलकरणीचा छळ केला, नंतर नग्न व्हिडिओ शूट करुन...; अभिनेत्रीवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

FIR Against Famous Actress: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री डिंपल हयाती आणि तिच्या पतीवर त्यांच्या मोलकरणीने छळ आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मोलकरणीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Shruti Vilas Kadam

FIR Against Famous Actress: तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री डिंपल हयातीची मोठी अडचण झाली आहे. हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्री आणि तिचा पती डेव्हिडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कपलच्या मोलकरणीने त्यांच्यावर छळ, मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. हैदराबादमधील फिल्मनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'सियासत.कॉम' या न्यूज पोर्टलनुसार, पोलिसांनी सांगितले की पीडितेचे नाव प्रियंका बीबर आहे. ती २२ वर्षांची आहे आणि ओडिशाची रहिवासी आहे. ती २२ सप्टेंबर रोजी श्री साई गुडविल सर्व्हिसेसच्या माध्यमातून कामाच्या शोधात ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातून हैदराबादला आली होती. तिला डिंपल हयाती आणि तिचा पती डेव्हिडच्या घरी मोलकरणीची नोकरी मिळाली.

मोलकरणीचे आरोप

मोलकरणीने असा आरोप केला आहे की काम सुरु केल्यापासून तिला सतत अपमानित केले जात आहे. तिला नीट जेवण दिले जात नाही, शिवीगाळ केली जात होती आणि अपमानास्पद टिप्पणी केल्या जात होत्या. मोलकरणीने दिलेल्या माहितीनुसार, त्या कपलने तिला असेही सांगितले की तिच्या आयुष्याची त्यांना त्यांच्या चप्पले इतकीही किंमत नाही.

नग्न व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न...

मोलकरणी प्रियांकाने दावा केला की हाणामारी दरम्यान तिचे कपडे फाटले होते. तिने असाही आरोप केला की तिचे नग्न व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिच्या एजंटच्या मदतीने मोलकरणी पोलिसांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली आणि थोडक्यात बचावली.

या कलमांखाली डिंपल हयात आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पीडित मोलकरणीच्या तक्रारीवरून फिल्मनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ७४, ७९, ३५१ (२) आणि ३२४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डिंपल हयात किंवा तिच्या पतीकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.

डिंपल हयात कोण आहे?

डिंपल हयातीबद्दल बोलायचे झाले तर, तिने २०१७ च्या तेलुगू चित्रपट "गल्फ" मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती आनंद एल. राय यांच्या "अतरंगी रे" या चित्रपटातही दिसली, यामध्ये तिने धनुषची गर्लफ्रेंड मंदाकिनीची भूमिका केली होती. याशिवाय, डिंपलने "देवी २", "खिलाडी", "युरेका", "रामबनम" आणि वीरमाई वागाई सूदूम सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: आंदोरा गावात पार पडला बळीराजा महोत्सव

SCROLL FOR NEXT