Smita Shewale: तीन वेळा मला ही भूमिका...; प्रसिद्ध अभिनेत्रीला साकारायचंय 'हे' खास पात्र, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

Smita Shewale: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. तिला या दोन खास भूमिका साकारण्याची इच्छा आहे.
Smita Shewale
Smita Shewale
Published On

Smita Shewale: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. ‘यंधळी’, ‘कुलस्वामिनी’, ‘मुक्ती’, ‘लग्नासाठी काहीही करेल’ अशा चित्रपटांपासून ते मालिकांपर्यंत तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भावनाप्रधान अभिनय, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि विविधतेने नटलेल्या भूमिकांमुळे स्मिता आज मराठीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्रीने नुकत्याच सकाळ प्रिमियरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनातील एक खास इच्छा व्यक्त केली आहे. तिने सांगितले की, ऐतिहासिक किंवा प्रेरणादायी व्यक्तिरेखा साकारण्याचं आकर्षण कायम माझ्या मनात आहे. विशेषत: सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. तीन वेळा माझ्याकडून ही भूमिका साकारण्याची संधी हुकली. हे पात्र मी अनेकदा आपल्या मनाशी जोडून पाहिलं असून, दुर्दैवाने आतापर्यंत तिला ही संधी मिळालेली नाही.

Smita Shewale
Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

याचबरोबर स्मिताने उलगडलं की सुमारे दहा वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटाची तयारी सुरू होती. त्या काळात तिची लुक टेस्टही झाली होती. या प्रकल्पासाठी स्मिताला या भूमिकेसाठी निवडलं होतं. मात्र, स्मिता स्वतः थोडी संकोचली होती. कारण लतादीदींसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारताना तिला वाटत होतं की तिचा आवाजही तसाच यायला हवा.

Smita Shewale
Indian Idol: पुन्हा सजणार सुरांची मैफील; या दिवसापासून सुरु होणार 'इंडियन आयडल'चा नवा सीझन

दरम्यान, निर्मात्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तिला गाणं गाण्याची गरज नाही, तर अभिनयातून लतादीदींच्या व्यक्तिरेखेला न्याय द्यायचा आहे. या प्रक्रियेत तिला मिळालेला अनुभव तिने खूपच अमेजिंग असल्याचं सांगितलं. मात्र, प्रकल्प पुढे न गेल्याने तो अपूर्णच राहिला.

तरीदेखील स्मिताच्या मनात या व्यक्तिरेखांनी कायमच एक खास जागा निर्माण केली आहे. भविष्यात योग्य संधी मिळाल्यास, ती सावित्रीबाई फुले किंवा लता मंगेशकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पडद्यावर दिसू शकेल. अशा भूमिका तिच्या अभिनयाला नवा आयाम देणाऱ्या ठरतील यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com