Asha Bhosale
Asha Bhosale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosale: गायनासह पाककलेतही आशा भोसले सर्वोत्कृष्ट; 'या' देशांमध्ये आहेत आशाताईंचे रेस्टॉरंट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडसह अनेक भाषेतील चित्रपटांमधील गाण्यांना आपल्या आवाज देणारी गानसम्राज्ञी आशा भोसले(Asha Bhosale) यांचा आज वाढदिवस(Birthday). त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये सांगलीत झाला. त्या आज ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. अशा भोसलेंना संगीत क्षेत्रासोबतच पाककलेची ही खूप आवड आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये बिर्यानी बनवतानाचा व्हिडीओ आणि फोटोज ही शेअर केले होते. आशा भोसले यांचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आशा भोसले यांचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. दुबई आणि कुवेतमध्ये आशा भोसलेंचे 'आशाज' नावाचे रेस्टॉरंट आहे. तसेच आबुधाबी, दोहा, बहरीन येथे सुद्धा त्यांचे अनेक रेस्टॉरंट आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये खवय्ये भारतीय पदार्थ मोठ्या चवीने आणि आवडीने खातात. आशा भोसले स्वत: त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये शेफना ट्रेनिंगही देतात.

आशा भोसले यांना कुकिंगची खूप आवड आहे. त्यांनी बनवलेले 'कढई गोश्ट' आणि 'बिर्याणी' हे पदार्थ अनेक सेलिब्रिटींना आवडतात. एका मुलाखतीमध्ये आशा भोसले यांनी सांगितले होते की, जर त्यांनी संगीतक्षेत्रात काम केले नसते तर त्या नक्कीच कुक झाल्या असत्या. आंतरराष्ट्रीय कूक रसेल स्कॉटने 'आशा' ब्रँडच्या रेस्टॉरंट्सचे राइट्स यूकेसाठी विकत घेतले आहेत. या अंतर्गत 'आशा' या नावाने सुमारे ४० रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

संगीत क्षेत्रात मंगेशकर घराण्याचे स्थान दिग्गज आहे. मराठी गाण्यांसोबतच आशाताईंनी बॉलिवूडमध्येही अनेक गाणी गायल्या आहेत. अनेक सदाबहर, भारदस्त, रोमॅंटिक गाणी त्यांनी सिनेसृष्टीला दिल्या आहे. आशाताईंनी गायनाची सुरुवात 'माझा बाळ' या चित्रपटातून केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Babar Azam Record: बाबर आझमने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनीलाही सोडलं मागे

SCROLL FOR NEXT