Koffee With Karan 7: कॉफी विथ करणमध्ये रंगली कतरिनाच्या हनिमूनची चर्चा; कतरिनाही बिनधास्त बोलली...

'कॉफी विथ करण' या शोच्या आगामी एपिसोडमध्ये 'फोनभूत' चित्रपटाची स्टार्सकास्ट कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर उपस्थित राहणार आहेत.
Koffee With Karan 7
Koffee With Karan 7Saam Tv

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा(karan johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण ७' सध्या तूफान चर्चेत आहे. शोमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी शोचे होस्ट करण जोहर उपस्थितांना आपल्या खास शैलीत प्रश्न विचारतो. दरम्यान, स्टार्स त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी संबंधित अनेक रंजक खुलासे करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत.

Koffee With Karan 7
Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकर यांनी कोळी समाजाची हात जोडून मागितली माफी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण

'कॉफी विथ करण' या शोच्या आगामी एपिसोडमध्ये 'फोनभूत' चित्रपटाची स्टार्सकास्ट कतरिना कैफ(Katrina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर उपस्थित राहणार आहेत. आगामी एपिसोडचा प्रोमो देखील व्हायरल झाला आहे. चॅट शोमध्ये कतरिना, इशान व सिद्धांतसोबत करण जोहर मजेदार गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी कलाकारंनी वैवाहिक आयुष्याशी निगडीत रंजक खुलासे केले आहेत. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Koffee With Karan 7
Marathi Movie : दोन वैऱ्यांची धमाल विनोदी कहाणी ; भाऊबळी चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

'कॉफी विथ करण'च्या आगामी भागात 'फोनभूत' चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावली आहे. या टॉक शोमध्ये सिद्धांत चतुर्वेदीने त्याच्या क्रशबद्दल खुलासा केला आहे. शो चा होस्ट करण जोहरने कतरिनाला आलिया भट्टने हनिमूनबद्दल मांडलेल्या तिच्या वक्तव्याशी निगडीत एक प्रश्न विचारला आहे. ज्याच कतरिनाने भन्नाट उत्तर दिले आहे ज्याने उपस्थितांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'हानिमून वैगेरे काहीही नसतं' असं अलिया अलिकडेच शोमध्ये म्हणाली होती. तर तूझे यावर काय मत आहे? असे शो चा होस्ट करणने कतरिनाला विचारले असता, यावर कतरिनाने लक्षवेधी उत्तर दिलं आहे. 'ती म्हणाली नेहमी हानिमून असली पाहिजेच असं काही नाही, तर हानिमून करण्याचा एकच खास दिवस असावा' कतरिनाच हे धडाकेबाज उत्तर ऐकून सर्वचं आश्चर्यचकित झाले आहेत.

यावेळी सिद्धांत चतुर्वेदीला त्याच्या लव्ह लाईफवर प्रश्न विचारला असता, सिद्धार्थने स्वतःला सिगंल असल्याचं सांगितलं. 'सध्या माझे काम हे माझे प्रेम आहे. कतरिनाने तिच्या लग्नामध्ये मला आमंत्रित करण्याच विशेष कारण म्हणजे ती माझी तिच्या एका बहिणीशी ओळख करून देणार होती.' असे सिद्धार्थने करण जोहरला सांगितले.

करण जोहर सीझनच्या प्रत्येक एपिसोडमध्ये स्टार्सना त्यांच्या क्रशबद्दल बोलायला भाग जाते. कारण जोहरला वाटते की त्याच्या शो 'कॉफी विथ करण'मुळे आलिया-रणबीर आणि विकी-कतरिना यांसारख्या अनेक यशस्वी बॉलिवूड नातेसंबंधांचे रहस्य उघडकीस आले आहे. दरम्यान, करण सिद्धांत चतुर्वेदीला अशीच आशा देताना दिसला आणि म्हणाला की, पुढच्या वेळेस इसाबेल कैफसोबत तुझे नाव ऐकले तर आश्चर्य वाटायला नको.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी 'फोन भूत' या चित्रपटात दिसणार आहेत. हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com