Jenifer Mistry Allegation On Producer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jennifer Mistry Allegation On Producer: ‘निर्मात्यांनी लैंगिक संबंध केले नाही पण...’ म्हणत जेनिफरने केला महत्वाचा खुलासा

Jennifer Mistry Demands Apology: जेनिफरने तिच्याबद्दल वेगवेगळे प्रकारचे गॉसिप्स केले जातात, जे पूर्णपणे चुकीचे आहेत. यावर तिने भाष्य केले.

Chetan Bodke

Jenifer Mistry Interview: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मिसेस रोशन सिंग सोढी उर्फ ​​जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांसह, प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. आता पुन्हा एकदा जेनिफर मेस्त्रीने मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. यावेळी तिने तिच्याबद्दल वेगवेगळे प्रकारचे गॉसिप्स केले जातात, जे पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या मुलाखतीमध्ये जेनिफरनं सांगितलं की, असित मोदी यांनी तिचं लैंगिक शोषण नाही तर वाईट पद्धतीनं बोलत तिला त्रास दिला. जेनिफरने आरोप करताच मालिका सोडून दिली.

जेनिफर मिस्त्रीने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना सांगितले की, “मी निर्माते असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज विरोधात ४ एप्रिलला तक्रार दाखल केली होती. मी फक्त माझे पैसे परत मागत नाही, तर जे माझ्याबरोबर चुकीचं घडलं त्याबद्दल माफी मागितली जावी अशी मागणी केली आहे.”

जेनिफर मिस्त्रीने पुढे सांगितले की, “मी मीडियासमोर सत्य सांगितले, तेव्हा त्यांनी मी व्यावसायिक नसल्याचा आरोप देखील केला होता. मी हे देखील स्पष्ट करू इच्छिते की, इतकंच नाही तर अनेकांनी असित कुमार मोदीनी माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याची देखील चर्चा सुरू केली होती. परंतु असं काहीच नाही. तो माझ्यासोबत वाईट कृत्याने बोलला. मी हात जोडून सांगते की नाही त्या चर्चा करू नका आणि कुणाच्याही प्रतिष्ठेला डाग लावू नका.”

जेनिफर मिस्त्रीने पुढे सांगितले की, “नोटीस नुकतीच पोलिस ठाण्यात पोहोचली आहे. मी सध्या तरी मुंबईत नाही. मी मुंबईला गेल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल. आता ते माझ्यावर कोणते खोटे आरोप करतात ते पाहू. मी प्रतिक्रिया देताना प्रत्येक शब्द बरोबर वापरला आहे. त्याने जे काही केले ते पूर्णपणे चुकीचे आहे, हे त्याला मान्य करावे लागेल आणि त्याला हात जोडून माफी मागावी लागेल.”

माहितीसाठी सांगतो, जेनिफर मिस्त्रीने आरोप केला होता की, असित मोदीने तिला अनेक वेळा आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले आणि अशा गोष्टी केल्या ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. तर दुसरीकडे, होळीच्या दिवशी सेटवर सोहेल आणि जतीनने तिच्यासोबत गैरवर्तन केले. जेनिफरच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना निर्माते म्हणाले होते की, जर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यामुळे तो कायदेशीर कारवाई करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

Hedavi Travel : अथांग पसरलेला समुद्रकिनारा अन् गणेशाचे मंदिर; कोकणातील पर्यटनाची शोभा वाढवते हेदवीचं सौंदर्य

Maharashtra Live News Update : रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT