Actor David Warner
Actor David Warner saam tv
मनोरंजन बातम्या

David Warner : टायटॅनिकफेम डेव्हिड वॉर्नर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : टायटॅनिक (Titanic) चित्रपटात (movie) खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हिड वॉर्नर (Actor David Warner) यांचं निधन झालं आहे. वाॅर्नर हे खूप दिवसांपासून कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होते. अखेरीस वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची प्राणज्याेत मालवली. डेव्हिड वॉर्नर यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी (family) माध्यमांना दिली. (Actor David Warner News)

वाॅर्नर हे गेल्या 18 महिन्यांपासून आजारी हाेते. त्यांच्या उपचार सुरू होते असे कुटुंबियांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. त्यांच्या असामान्य कार्याने गेल्या काही वर्षांत अनेकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविलं आहे. त्यांच्या निधनानं आम्ही पाेरके झाले आहाेत असेही कुटुंबियांनी नमूद केले.

या चित्रपटांमध्ये काम केले

डेव्हिड वॉर्नर यांनी (सन 1971) मध्ये रिलीज झालेला सायकोलॉजिकल थ्रिलर स्ट्रॉ डॉग्स, (सन 1976) मधील हॉरर क्लासिक द ओमन, (सन 1979) मध्ये टाइम ट्रॅव्हल फिल्म टाइम आफ्टर टाइम आणि (सन 1997 चा) ब्लॉकबस्टर टायटॅनिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. टायटॅनिकमध्ये त्यांनी व्हिलन स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती.

तीन दशकांनंतर रंगभूमीवर परत

(सन 2001 मध्ये) वॉर्नर मेजर बार्बरामध्ये अँड्र्यू अंडरशाफ्टची भूमिका करत जवळपास तीन दशकांनंतर थिएटरमध्ये परतले. (सन 2005 मध्ये) त्यांनी चिचेस्टर फेस्टिव्हल थिएटरमध्ये शेक्सपियरच्या किंग लिअरमध्ये भूमिका केली आणि (सन 2007 मध्ये) शेक्सपियरच्या कॉमिक बफून फाल्स्टाफची भूमिका केली.

टीव्हीवरही काम केले

डेव्हिड वॉर्नरने टीव्हीवरही काम केले. (1966 मध्ये) प्रदर्शित झालेल्या मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट या चित्रपटासाठी डेव्हिड वॉर्नरला ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. (1981 मध्ये) डेव्हिड वॉर्नरने टीव्ही मिनी-सिरीज मसाडासाठी एमी पुरस्कार जिंकला. डेव्हिड वॉर्नर 'डॉक्टर हू', 'पेनी ड्रेडफुल' आणि 'रिपर स्ट्रीट' सारख्या टीव्ही शोमध्येही दिसला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

Live Breaking News : Raigad Breaking : सांगोल्यात बागलवाडीत EVM मध्ये बिघाड

Rohit Sharma Record: आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्मा रचणार इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

Shinde vs Thackeray : हातकणंगलेत हायव्होल्टेज राडा! शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT